
मुंगसरे (प्रतिनिधी)- महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे कृषिदुत :- मयुर रायसिंग, महेशकुमार पाटील, पियुष पवार , अंगत पाटील, आदित्य राजपूत ,ओम ढिकले, अविष्कार संधान ,ओमकार संधान , यांचे ग्रामीण कृषि कार्यानुभव व कृषि औद्योगिक कार्यक्रम २०२५-२६ च्या अभ्यास दौऱ्या निमित्त मुंगसरे येथे आगमन झाले. ग्रामस्थांनी कृषीदूतांचे स्वागत केले.या अभ्यास दौऱ्या दरम्यान कृषिदूत शेतक-यांना शेतीविषयक शास्त्रीय माहिती, हंगामा प्रमाणे पीक पद्धती, रासायनिक खतांचा योग्य वापर, कीटकनाशके फवारताना घ्यावयाची काळजी कीटकनाशक आणि सेंद्रिय शेती याबद्दल माहिती देतील.अभ्यास कालावधी चार महिन्यांचा असून यादरम्यान माती परीक्षण, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन , पीक संरक्षण याबाबत प्रात्यक्षिक घेतले जातील.आगमनावेळी मुंगसरे गावचे सरपंच रामदास उगले , उपसरपंच शीतल ताई भोर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण भवरे व सचिन पवार आणि इतर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा.के. एस. बंदी, संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चेंट, चांगदेवराव होळकर, विश्वस्त व प्राचार्य डॉ.के.एन. नांदूरकर, डॉ.एस.एस. साने, शकुंतलाताई वाघ, डॉ.व्ही.एस. माने, एस.जी. ठाकरे, डॉ. प्रीती भामरे व कॅम्पस समन्वयक डॉ. व्ही.एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ.एस.एम. हाडोळे, प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. दिपक पाटील, प्रा. ज्योती मोटे प्रा. सोनोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
