
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३८ वा दिवस
जिथे प्रामाणिक धारणा आहे, जिथे हेतू शुद्ध आहे असे लोक थोडे जरी असले तरी, ते सर्व प्रकारच्या अडचणींवर पूर्णपणे मात करून विजयी होतील यात मला शंका नाही. एखाद्या व्यक्तीच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निःस्वार्थपणा या तीन गोष्टी असतील तर या समस्त ब्रम्हांडात अशी एकही शक्ती नाही की जी त्या व्यक्तीला पराभूत करु शकेल. या तीनही गोष्टींनी सुसज्ज असलेली एकच व्यक्ती समग्र विश्व जरी विरोध करण्यासाठी समोर उभे ठाकले तरी त्याला तोंड देण्यास समर्थ असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १६ जून २०२५
★ १९२५ बंगाल मधिल विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजन दास यांचा स्मृतीदिन.
★ १९४४ भारतीय रसायनशास्त्रज्ञ, देशातील वैज्ञानिक चळवळीचे प्रणेते आचार्य प्रफुल्लचंद्र रे यांचा स्मृतीदिन.
★ २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस.
रोखे से ना रुखे हम, मर्जी से चल हम…
सुरजसा चमके हम, स्कूल चले हम..
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
