
नाशिक रोड (प्रतिनिधी) दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर काॉलेज,नाशिक.या शाळेत आज सोमवार दि.१६/०६/२०२५ रोजी इ.५ वी ते ८ वीच्या विद्यार्थिंनीचा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करुन शाळेची पहिली घंटा वाजली.यावेळी शालेय परिसरात नक्षीदार रांगोळी काढून,फुगे,पताका लावून,फुलांनी सुशोभीकरण व औंक्षण करुन विद्यार्थिंनींचे जोरदार स्वागत करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम यांच्या हस्ते शालेय गणवेश व उपस्थित विद्यार्थिंनिना प्रातिनिधिक स्वरूपात समग्र शिक्षा अभियानांतर्गत इ.५ वी ते ८ वी पर्यंत मोफत पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.त्याचबरोबर उपस्थित नवागतांचे औंक्षण व बिस्किटे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी त्यांनी विद्यार्थिंनिना काही महत्त्वाच्या सूचना देतांना शाळेची माहिती व फक्त मुलींची शाळा असल्याने त्यांच्या करिअर,व्यक्तिमत्वाला अधिक महत्त्व दिले जाते.पुढे त्यांनी रोज शाळेत येऊन अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनही करावे,असे सांगितले.उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सरांनी सर्वाचे स्वागत करून *एक दोन तीन चार आम्ही सा-या मुली हुशार* ही अंकाची कविता आणि *सा-यांनी मिळून ठरवायचं..**शाळेला छान छान बनवायचं..*अशा सुंदर कविता नवागंताच्या स्वागतासाठी सरांनी त्यांच्या सुंदर आवाजात गायिले.गव्हर्निंग कौन्सिल सदस्या सौ.भारती चंद्रात्रे मॅडम यांनी शाळेची वैशिष्ट्ये व शालेय शिक्षकांचे परिचय करून दिले.तसेच शालेय पदाधिकारी व शिक्षकांनीही नवीन उपस्थित विद्यार्थिंनिनीचे औंक्षण व बिस्किटे देऊन स्वागत केले.शेवटी सर्व नवागंतानी प्रवेशोत्सवानिमित गाण्याच्या माध्यमातून नाचून आंनदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व श्री मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.फलकलेखन सौ.सायली मुळे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश वैशंपायन साहेब,उपाध्यक्ष मा.श्री प्रभाकर कुलकर्णी साहेब,सेक्रेटरी मा.श्री हेमंत बरकले सर,शालेय समिती चेअरमन मा.श्री रमेश महाशब्दे साहेब यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभत असते.व विद्यार्थिंनीना शुभेच्छा दिल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सविता कुशारे मॅडम,अधिक्षिका सौ.मीना वाळूंजे मॅडम,उपमुख्याध्यापक श्री राजेंद्र सोमवंशी सर व ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक श्री. मिलिंद कोठावदे सर,पर्यवेक्षिका सौ.सुषमा गवारे मॅडम,गव्हर्निग कौन्सिल सदस्य श्री कैलास बागुल सर,सौ.भारती चंद्रात्रे मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थिंनी व पालक उपस्थित होते.
