
नाशिक-(प्रतिनिधी )स्रीत्वाचा आदर करणे ही आपली संस्कृती ज्या देशांमध्ये स्त्रियांचा आदर केला जातो. त्या देशाची क्रांती होते. कारण त्या ठिकाणी सत्याचा मार्ग सापडतो. त्यासाठी सत्याचा मार्ग सोडू नये आणि अनितिचा मार्ग धरू नये असे प्रतिपादन सेवानिवृत्त सनदी अधिकारी बी. जी. वाघ यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठान संचलित महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंच नाशिक शहराच्या वतीने दहावी व बारावी गुणवत्ता प्राप्त मुलींच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक आणि अवरसचिव नंदकुमार राऊत होते. आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही त्यासाठी मेहनत, कष्ट करण्याची तयारी आपण केली पाहिजे त्याबरोबरच आदर्श संस्काराची ही गरज आहे त्यामुळे आचार विचारांच्या देवानघेवाणीतून आयुष्य समृद्ध बनवा, असे नंदकुमार राऊत यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य गिरजा महिला मंचच्या अध्यक्षा शितल कुयटे यांनी आपल्या मनोगतातून गिरजा महिला मंचची वाटचाल आणि महिला नेहमी झगडत असते भांडत असते पण तरीही सत्याचा मार्ग शोधत त्यासाठी महिलांना बळ देण्याची गरज आहे ते काम गिरजा महिला मंच करत आहे असे गौरवोदगार काढले. आलेल्या पाहुणे, पालक, विद्यार्थीनीचा जिल्हा सचिव माधुरी भावनाथ, शहराध्यक्ष हर्षाली भोसले, जयश्री क्षिरसागर, शितल चव्हाण यानी स्वागत केले. शहरातील 55 गुणवत विद्यार्थीनीचा मानपत्र, स्मृतिचिन्ह, पेन देऊन सन्मानित केले.यावेळी प्रास्तावीक अलका दराडे यानी केले.सूत्रसंचालन आशा गोवर्धने यांनी केले, तर आभार सुनंदा पाटील यांनी मानले.
