फलक रेखाटन – देव हिरे. (कलाशिक्षक ,शिक्षण मंडळ भगूर संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

दि.भगुर (प्रतिनिधी ) १६ जून २०२५ या दिवसापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. शासनाच्या वतीने सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वतीने या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत बालकांचे १००% शालेय प्रवेश करून तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेची ओढ लागावी ,शिक्षणाची गोडी निर्माण होऊन शाळेबद्दल आस्था वाढावी व शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. दीर्घ सुट्टीनंतर शाळेत येणाऱ्या व नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे पुष्प देऊन वाजत गाजत स्वागत केले जाईल. तसेच मोफत पाठयपुस्तके व गणवेश वितरण व शालेय पोषण आहारात गोड पदार्थांचे वाटप असे उपक्रम शाळेतर्फे राबवण्यात येतील. नवे दप्तर,नवी वही, नवे पुस्तक,नवा वर्ग,नवे मित्र,नवे शिक्षक,व नव्या शाळेत उज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन येणाऱ्या सर्व बाल गोपालांचे रंगीत खडू माध्यमात शाळेच्या दर्शनी फलकावर चित्रमय फलक रेखाटनातून सहर्ष स्वागत.
