
अलिकडे खाजगी संस्थांकडून पुरस्कारांचे वाटप मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे, आणि याला पुरस्काराचे ‘बाजारू संस्कृती’म्हणून संबोधले जात आहे किंवा ‘सुळसुळाट’ असे संबोधले जात आहे. अनेक खाजगी संस्था, ज्या समाजासाठी काहीतरी विशेष काम करत नसतील, तरीही केवळ प्रसिद्धीसाठी किंवा इतर स्वार्थासाठी पुरस्कार देत आहेत.याचा अर्थ असा नाही की सर्वच खाजगी संस्थांचे पुरस्कार निरुपयोगी आहेत. काही संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि त्यांचे पुरस्कार योग्य व्यक्तींना मिळत असतील, पण अनेकदा असे दिसते की पुरस्कारांचे स्वरूप आणि वाटप करण्याची पद्धत पारदर्शक नसते. या ‘पुरस्कारांच्या सुळसुळाटा’मुळे समाजावर आणि पुरस्कारांच्या मूळ उद्देशावर नकारात्मक परिणाम होत आहे. पुरस्कारांचे महत्त्व कमी होत आहे आणि योग्य व्यक्तींना पुरस्कार मिळत नसल्यामुळे नैराश्य येऊ शकते.सोशल मीडियावर पुरस्कार देणाऱ्या संस्थांची मोठ मोठी जाहिरात वाचायला मिळत आहे.यातील काही संस्थांचे कधीच नाव ऐकले नाही.. अशा संस्थांची कार्यपद्धती,उद्दिष्टे, ध्येय काय? हे कधीच समोर आलेले नाहीत. मात्र सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला तसतशा सेवाभावी संस्थांचा उदय व सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.काही सेवाभावी संस्थांचे कार्य उल्लेखनीय आहे.त्यांचा सेवाभाव,त्यांचे विधायक कार्य उल्लेखनीय व उदात्त आहे.अशा संस्थांचा पुरस्कार योग्य व्यक्तींना मिळालाच पाहिजे.मात्र काही संस्थानी पुरस्कार वाटण्याचा उद्योग सुरू केला आहे..काही संस्थांचा शोध घेतला असता,या संस्थांचे ना कार्यालय, न कुठलेच कार्य आढळले नाही..केवळ पुरस्कार वाटप करण्याच्या नावापुरते या संस्था समोर येतात..रजिस्ट्रेशनच्या नावावर दोन हजारांपासून ते पाच हजारांपर्यंत घेतात..काही संस्थानी स्वतःला जागतिक संस्थांचे लेबल लावून लाखो रुपये पुरस्कर्त्यांकडून रजिस्ट्रेशनच्या नावावर घेत आहे.या समस्येवर उपाय म्हणून, पुरस्कार देणाऱ्या संस्थांची निवड करताना अधिक काळजी घेणे, पुरस्कारांचे निकष अधिक स्पष्ट करणे आणि वाटप प्रक्रियेत अधिकाधिक पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्देपारदर्शकता:पुरस्कारांचे निकष आणि निवड प्रक्रिया सर्वांसाठी खुली असायला हवी.सत्यापना:ज्या व्यक्तींना पुरस्कार दिला जात आहे, त्यांचे काम आणि योगदान व्यवस्थित तपासले पाहिजे.उद्देश:पुरस्कारांचा उद्देश स्पष्ट असायला हवा आणि तो समाजासाठी उपयुक्त असायला हवा.टीका:पुरस्कारांवर होणारी टीका योग्य असल्यास, त्यावर विचार करून सुधारणा करणे आवश्यक आहे.एकंदरीत, पुरस्कारांचे महत्व टिकवून ठेवण्यासाठी आणि समाजाला त्याचा खरा फायदा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. ९५६१५९४३०६
