
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात नवगतांच्या स्वागतासाठी कला शिक्षिका श्रीमती आरती मोरे यांनी रंगविलेला
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) – मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज सोमवार( ता 16) विद्यालयात प्रवेश घेतलेल्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या नवगतांचे स्वागताची जय्यत तयारी झाली असून पहिल्या दिवशीच शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पाचवी ते आठवीपर्यंतच्या मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण 11.30 वाजता करण्यात येणार आहे यावेळी विद्यालयात प्रवेश घेतलेल्या नवगतांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात येणार असून त्यांना स्कूल कमिटी सदस्यांच्या हस्ते पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येणार आहे यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यालयात रांगोळी काढण्यात आली असून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येणार आहे विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला असून त्यांना पहिल्या दिवशीच पोषण आहार देखील दिला जाणार आहे
प्रतिक्रिया- श्री डी बी मोगल उपसभापती मविप्र- मौजे सुकेणे येथील विद्यालय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व शारीरिक प्रगतीसाठी अनेक उपाययोजना करते कसबे सुकेणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी विद्यालयात त्वरित मोफत प्रवेश घ्यावा
प्रतिक्रिया -रायभान दवंगे प्राचार्य – मौजे सुकेने विद्यालयात अभिनव गटापासून ते बारावीपर्यंत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशीच स्वागत केले जाणार असून शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांची वितरणही मान्यवरांच्या हस्ते दिले जाणार आहे
