

भारतीय जनता पार्टी नाशिक. व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष. नरेंद्र देवेंद्र प्रतिष्ठानचे संस्थापक. संस्कृती कला रक्षक केंद्राचे अध्यक्ष. जैन संघटना नांदगाव चे अध्यक्ष तसेच लोकमान्य टिळक वाचनालय नांदगाव अध्यक्ष. आणि राष्ट्रीय सेवा संघाचे (प्रवक्ते) आदरणीय दत्तराज रमणलाल छाजेड यांना त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३७ वा दिवस* शिक्षण म्हणजे व्यक्तीच्या क्षमतांचे विकसन करणे, प्रेरणा निर्माण करणे. शिक्षणाचा मूळ उद्येश प्रत्येक व्यक्तिमधील सुप्त गुणांचा विकास करणे हा आहे. केवळ माहिती गोळा करून ती विद्यार्थ्यांच्या डोक्यात कोंबने म्हणजे शिक्षण नाही, तर शिक्षणाचे सार मनाच्या एकाग्रतेत आहे. एकाग्रता ही चिंतनातून विकसित होते. मनाच्या एकाग्रतेसाठी इंद्रियनिग्रही वृत्ती गरजेची असते. ज्ञानप्राप्तीसाठी एकाग्रतेबरोबरच श्रद्धाही आवश्यक आहे. श्रद्धा हेच विकासाचे मूळ आहे. मनुष्याच्या विकासात श्रद्धेचे स्थान महत्त्वाचे आहे. या श्रद्धेनेच माणूस बलवान अथवा दुर्बल बनतो. श्रद्धेचे पुनरुज्जीवन झाल्यास आपल्या पुढील सर्व प्रश्न आपण सहजपणे सोडवू यात शंका नाही. स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २५ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. १५ जून २०२५
★ १८९८ शिक्षणतज्ज्ञ, गीता अभ्यासक, पुणे विद्यार्थी गृहाचे संस्थापक सदस्य डॉ. गजानन श्रीपत तथा आण्णासाहेब खैर यांचा जन्मदिन.
★ १९३८ ग्राम स्वच्छता अभियान राबवून आदर्श ग्रामपरिवर्तन करुन समाजाला नवी दिशा देणारे महाराष्ट्रातील समाजसेवक किसन बाबूराव ऊर्फ अण्णा हजारे यांचा जन्मदिन.
★ आंतरराष्ट्रीय हवा दिन.
★ जागतिक पिता दिन ‘पितृदिन’ (फादर्स डे)
