
लेखन:- रवींद्र सुमन मुकुंदराव मालुंजकर, नाशिकरोड./मो.९४२३०९०५२६*(ता.क. :- ही कविता माझ्या ‘आठवांचे लक्ष मोती’ या काव्यसंग्रहात समाविष्ट आहे.)
*जून महिन्यात दि.२१ डिसेंबर २०२०ची गोष्ट. सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडलो आणि घरी परतत असताना साठीतील एक गांधीटोपी घातलेली व्यक्ती कडाक्याच्या थंडीत स्वेटर वगैरे न घालता सायकलवर जोराजोरात पॅडल मारताना नजरेस पडली आणि मला माझ्या दादांची आठवण तीव्रतेने झाली… नाशिकरोडच्या श्री जयरामभाई हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून नोकरी करत असताना दररोज सकाळी साडेसहा वाजता घराच्या बाहेर पडणारे आणि शाळेतील सर्व कामे करून रात्री सात वाजता घरी पोहोचणारे दादा क्षणभर मन:पटलासमोर आले आणि त्या विचारात असताना अचानक एक कविता स्फुरली… कविता लिहून सिद्धहस्त कवी विवेकजी उगलमुगले, राजेंद्र उगले, प्रा.राजेश्वर शेळके सर यांना पाठवली. त्यांनी योग्य त्या सूचना केल्या. डोंबिवली येथील उपक्रमशील शिक्षक, सिद्धहस्त सुलेखनकार, गोड गळ्याचे गायक आणि सादरकर्ते, सुस्वभावी व्यक्तिमत्त्वाचे निवेदक- *मा.उमेश शिंदे सर (8275465698)* यांनी कोरोना लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील १०००पेक्षा अधिक कविता सादर करून वेळ खऱ्या अर्थाने सत्कारणी लावला. माझ्याही काही कविता त्यांनी सुरेल आवाजात सादर करून सर्वत्र पोहोचवल्या. त्यामुळे कवी म्हणून मला निश्चितच अत्यानंद आहे. माझी ही नवी रचनासुद्धा त्यांनी धीरगंभीर आवाजात सादर करून माझ्यापर्यंत पोहोचवली. महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक ‘ॲग्रोवन’ ने ही कविता प्रकाशित केली. सर्व सहृदयी मित्रांचे मनापासून आभार…!*_दादा… तुमची आठवण येते!_*हाडं गोठवणाऱ्या थंडीतजगण्याची लढाई लढण्यासाठीसायकलला पॅडल मारणारंकोणी पाहिलं की-दादा… तुमची आठवण येते!मी वही मागितल्यावरतुम्ही मोठ्या कसरतीनेबनवून द्यायचात माझ्यासाठी जुन्या पानांची वही.आज मुलांसाठी नवी वही आणतानाकुणाचा व्याकूळ चेहरा दिसला की-दादा… तुमची आठवण येते!अधूनमधून आमचं सुरू असतंहॉटेलमध्ये जाणं-येणंभरमसाठ बिल देणंपण दोन महिन्यातून एकदातुम्ही आणायचात तो गुलाबजाम काचेच्या बरणीत पाहिला की-दादा… तुमची आठवण येते!तुमच्या साध्याभोळ्या स्वभावातभर पडली ताईच्या धोरणीवृत्तीचीआणि नेटाने झाला संसार.आजही गरिबीशी दोन हात करताना सायकलवर फिरणारी एखादी कष्टकरी जोडी पाहिली की-दादा… तुमची आठवण येते!थोडाफार का होईना मला घेता आला तुमच्यातला वारसाज्याने लख्ख होतो दररोजमाझ्या मनातील विचारांचा आरसा.आरशातल्या प्रतिबिंबातून मी पाहतो माझे बालपण-आणि दादा…मला तुमचीच आठवण येते!*-
