
नाशिक (वार्ताहर) – जपान देशाने गेल्या पन्नास वर्षात औद्योगिक क्रांती करत जगावर आपला विशेष ठसा उमटवला आहे .गुणवत्तेच्या क्षेत्रात कायझन जपानी व्यवस्थापन प्रणालीने क्रांती केली आहे. कायझनचा अर्थ चांगल्या सुधारणा. गौतम बुद्धाच्या विचारांचा कायझन प्रणालीवर मोठा प्रभाव पाहायला मिळतो. असे प्रतिपादन प्रतिपादन गरुडझेप प्रतिष्ठानचे संस्थापक तथा व्यवस्थापन गुरु डॉ संदीप भानोसे यांनी केले ते मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात जपानी व्यवस्थापन कार्यशाळेत बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद केंद्राचे जेष्ठ कार्यकर्ते मधुकर देशपांडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ योग प्रशिक्षक चेतन राका, केंद्राचे मा. नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे, समवेत गृहप्रमुख सुधा सावंत, वसतिगृह कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना भानोसे पुढे म्हणालेत श्रेयस भानोसेचे १३ जून २०२४ रोजी निधन झाले होते त्याने देहदान केल्याने त्याच्या अवयवांच्या रुपाने अनेकांना जीवनदान मिळाले आहे. ‘मरावे परी देहरुपी उरावे’ ही श्रेयसची कृती समाजासाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे, आपण सर्वांनी नेत्रदान व देहदानाचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले. प्रसंगी डॉ. भानोसे यांनी उपस्थितांकडून वाहतूक सुरक्षा व पर्यावरण रक्षा जनजागृती अभियानाची प्रात्यक्षिके करुन घेतलीत. सायली कपूरे व साक्षी सोनवणे या विद्यार्थिनीने व्याख्यानातून देहदानाचा संकल्प केल्याचे सांगितले. प्रास्ताविक वसतिगृह गृहप्रमुख सुधा सावंत यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. अमोल अहिरे यांनी केले तर आभार नम्रता सावंत या विद्यार्थिनीने मानलेत.
