

नांदगाव (प्रतिनिधी)मविप्र समाज संस्थेची न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव शाळेचे डॉ. सी .व्ही .रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश..*विद्यालयातील दोन विद्यार्थिनी 1) कु. आरुषी गणेश बोरसे इ. सातवीतून 84 % 2) कु. वेदिका संजय जाधव इ.नववीतून 73.33% गुण मिळवून दोघींनी नांदगाव तालुक्यातून पहिली रँक प्राप्त केली .त्यांच्या या यशाबद्दल तालुका संचालक श्री अमित भाऊ बोरसे पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काकळीज व्ही वाय, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम काळे जे आर , उपमुख्याध्यापक थेटे एस. जी ,पर्यवेक्षक शेवाळे ए. एस तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वांनी अभिनंदन केले.
