
कासारी ( प्रतिनिधी, गणेश बागुल)शिक्षक नेते स्वर्गीय गंगाधर शिवराम आहेर प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित नांदगाव या संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी भाऊसाहेब श्रावण मवाळ सर यांची बिनविरोध निवड झाल्याने कासारी केंद्राच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर,केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावतीने त्यांचा संयुक्तिक व जाहीर सत्कार करण्यात आला.
