
कासारी(प्रतिनिधी, गणेश बागुल) विद्यार्थी उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके योजना शासनाने सुरू केल्याचे प्रतिपादन,कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर यांनी केंद्रस्तरीय मोफत पाठ्यपुस्तकाच्या वितरणाप्रसंगी केंद्रशाळा कासारी येथे केले.आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात १६ जून २०२५ सोमवार रोजी होत असल्याने शाळेच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करून ‘पुस्तक दिन’ साजरा करण्यात यावा,असे आवाहन केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर यांनी केंद्रातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना केले.याप्रसंगी कासारी केंद्रातील एकूण १७ जिल्हा परिषद शाळा व ३ माध्यमिक शाळांना इयत्ता पहिली ते आठवीचे एकूण २०८३ संचाचे विषयनिहाय्य वाटप करण्यात आले.सदर पुस्तक वितरणासाठी कासारी केंद्राचे केंद्रप्रमुख राजेंद्रजी काटकर सर केंद्रातील ग्रेडपात्र मुख्याध्यापक भाऊसाहेब मवाळ,प्रकाश मोरे,संजय पवार,रोहिदास निकम तसेच केंद्रातील शिक्षक हरिश्चंद्र जगधने,गणेश बागुल,भरत पवार,भरत देवरे,संजय पवार,पंकज जाधव,ज्ञानेश्वर सोनवणे,नवनाथ गीते,विजय तुरुकुणे,बाळासाहेब जोरवर,प्रकाश शिंगाडे,सागर गजभिव आदी शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले.
