सविस्तर चर्चा,नियोजन व पुढील रणनीती साठी शिक्षक संघटना प्रमुख पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे-मा.आ.किशोर भाऊ दराडे.


येवला (प्रतिनिधी )राज्यातील विना तथा अंशतः अनुदानित शाळा एवं शिक्षकांना १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णय नुसार पुढील वाढीव 20 % वेतन अनुदान टप्पा येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करून निधी वितरीत करावा ह्या अपेक्षेने राज्यातील ६० हजाराच्या वर शिक्षक बांधव चातकाप्रमाणे शासनाकडून आस लावून बसलेले आहेत.यासाठी आझाद मैदान मुंबई येथे उपरोक्त न्याय मागणीसाठी ५ जून पासून कृती समितीचे आंदोलन सुरू आहे तसेच १८ जून तारखेपासून शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन होणार आहे.त्या धर्तीवर न्याय मिळावा म्हणून नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार मा.आ.किशोर भाऊ दराडे हे सतत प्रयत्नशील आहेत.तसेच मंत्रालयीन पाठपुरावा करीत आहेत.तरी पावसाळी अधिवेशनात निधी उपलब्ध होऊन १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयाचे अनुपालन व्हावे म्हणून नाशिक विभागातील शिक्षक संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांच्या सोबत आमदार महोदय चर्चा करणार आहेत.यात पुढील रणनीती,विषय गांभीर्य, नस्ती प्रवास पाठपुरावा आणि इतर बाबी महत्त्वाच्या आहेत… तरी नाशिक विभागातील सर्व शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी,शिक्षक बंधू आणि भगिनी यांनी रविवार दिनांक १५ जून २०२५ रोजी के.व्हि.एन.नाईक महाविद्यालय डोंगरे वसतिगृह नाशिक येथे दुपारी २.०० वा.चर्चेत सहभागी व्हावे असे आवाहन मा.आ.किशोरभाऊ दराडे व शिक्षक सेनेचे नेते मा.संजय चव्हाण सर यांनी केले आहे.
