
वाड़गाव (ता.नाशिक )(प्रतिनिधी) १२ जुन २०२५ गुरुवार के. के. वाघ महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक अंतर्गत वाड़गाव येथे दाखल झाले असून, ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यामध्ये कृषिदुत नलावडे साहिल, मानस नांदुरकर, पुष्पेंद्र नायक, साहिल पाबळे, आदेश परदेशी, सर्वेश शिंदे , आदित्य बनकर यांचा समावेश असून ते तीन महिने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम व प्रात्याक्षिके दाखविणार आहेत. त्यात माती व पाणी परिक्षण, विविध पिकांचे लागवड तंत्रज्ञान, पिकांवर येणारे रोग व कीड यांची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन, शेतीशी निगडित विविध समस्यांचे निराकरण, बीजप्रक्रिया आदी विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

याप्रसंगी सरपंच सुनिल निंबेकर, उपसरपंच महेश कसबे , आदींसह ग्रामस्थ विलास कसबे,उमेश कसबे, राजाराम निंबेकर ,चंदु निंबेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, जनसंपर्क संचालक अजिंक्य वाघ, सचिव प्रा.के. एस. बंदी, संस्थेचे विश्वस्त अशोक मर्चेंट, चांगदेवराव होळकर, विश्वस्त व प्राचार्य डॉ.के.एन. नांदूरकर, डॉ.एस.एस. साने, शकुंतलाताई वाघ, डॉ.व्ही.एस. माने, एस.जी. ठाकरे, डॉ. प्रीती भामरे व कॅम्पस समन्वयक डॉ. व्ही.एम. सेवलीकर, प्राचार्य डॉ.एस.एम. हाडोळे, प्रा. परमेश्वरी पवार, प्रा. दिपक पाटील, प्रा. ज्योती मोटे प्रा.सोनोणे यांचे मार्गदर्शन लाभले.
