
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३६ वा दिवस मंत्रात वापरता येणार नाही असे एकही अक्षर नाही, तसेच निरुपयोगी, टाकाऊ, बिनकामाचा असा एकही मनुष्य या जगात नाही. मात्र असे असूनही ‘कुशल संघटक’ मिळणे मात्र दुर्मिळ आहे. संपूर्ण निष्कपटता, पावित्र्य, धैर्य, सर्वस्पर्शी बुद्धी, सहकारी वृत्ती व सर्वविजयी इच्छाशक्ती या साऱ्या गुणांनी युक्त अशा माणसांची आवश्यकता आहे. या गुणांच्या बळावर मुठभर जरी माणसे काम करायला एकत्रितपणे पुढे आलीत, तरी साऱ्या जगात क्रांती घडून येईल. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २४ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. १४ जून २०२५
★ संकष्टी चतुर्थी
★ १९१६ आद्य मराठी नाटककार, इंग्रजी, फ्रेंच, संस्कृत नाटकांची मराठीत भाषांतर करणारे गोविंद बल्लाळ देवल यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक रक्तदान दिन.
★ रक्तदान सर्वश्रेष्ठ दान…
