
नांदगाव (प्रतिनिधी )कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृषी अनुसंधान यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत दिनांक 29 मे 2025 चे 12 जून 2025 या कालावधीमध्ये संपूर्ण भारतात अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदगाव तालुका कृषी विभाग यांचे मार्फत मौजे पोखरी ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच एडवोकेट किरण राव शामराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व श्री संदीप मेढे उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथम वक्ते यांचे शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन पोखरी ग्रामपंचायत कार्यालयाद्वारे स्वागत करण्यात आले. सदर अभियानात राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे डॉक्टर श्री अजय कुमार उपाध्याय यांनी माती व पाणी तपासणी करून संतुलित खत व्यवस्थापन जैविक खते, सेंद्रिय खताचे शेती करिता महत्त्व पटवून देऊन जमीन सुपीक (जिवंत) करणे व पिका संजीवके महत्व व वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र वडल चे विषय विशेषज्ञ श्री संदीप नेरकर यांनी शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याबाबत व परिसरातील प्रमुख पिके लागवड तंत्रज्ञान, ट्रायकोडर्मा, गांडूळ खत निविष्ठांचा वाजवी वापर तसेच डाळिंब फळबाग लागवड व्यवस्थापन, भाजीपाला लागवड याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर श्रीमती सोनाली देसाई सहाय्यक कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क तयार करण्याची पद्धत व वापर आणि महत्व याची माहिती दिली. एकात्मिक हुमणी नियंत्रण, लष्करी अळी नियंत्रण याविषयी माहिती दिली व बियाणे उघड क्षमता, चाचणी बीज प्रक्रिया याविषयी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. मका पिकावरील उशिरा येणारा मर या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी ट्रायकोर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीचे महत्त्व समजावून सांगितले. सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री अमोल थोरात कृषी अधिकारी यांनी केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून व तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदगाव यांची द्वारे पोखरी गावात अभियान आयोजित करून सखोल मार्गदर्शन केल्यामुळे गावातील शेतकरी बांधवांना फायदा होईल असे मत पोखरी गावचे सरपंच एडवोकेट किरणराव शामराव गायकवाड यांनी अध्यक्ष भाषणात मत व्यक्त केले. कार्यक्रमास पोखरी गावची ग्रामपंचायत सदस्य श्री अरुण ढोकरे, श्री विजय वाघमोडे, श्री भुषण गायकवाड व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती सोनाली देसाई, श्रीमती प्रियंका पोटकुळे, श्रीमती जयश्री खलाटे, कृषी सेवक श्रीमती भक्ती भवरी, पोखरी ग्रामपंचायत कर्मचारी श्री रतन गायकवाड, दगू बागुल यांनी अथक परिश्रम घेतले.
