
येवला ( प्रतिनिधी ) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बाभुळगांव, ता.येवला, जि.नाशिक या शासकीय वसतिगृहात सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अनु.जाती-31 अनु.जमाती-2 इतर मागासवर्गीय-2 विशेष मागासवर्गीय-2 विजाभज-4 इ.प्रर्वगातील विदयार्थ्यांच्या जागा रिक्त असुन यामध्ये सर्व प्रवर्गामध्ये दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील विदयार्थ्यांसाठी समांतर आरक्षण धोरणानुसार अनुक्रमे 5 टक्के व 1 टक्के जागा रिक्त राहतील त्यासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. इच्छुक विदयार्थ्यांनी https://hmas.mahait.org/ या पोर्टलव्दारे प्रवेश अर्ज ऑनलाईन भरून ऑनलाईन अर्जाची प्रिंट व त्यासोबतची लागणारी स्वसांक्षांकित केलेली कागदपत्रे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, बाभुळगांव, ता.येवला, जि.नाशिक येथे जमा करावयाचे आहेत. तरी अनु.जाती/अनु.जमाती/इतर मागासवर्गीय/विशेष मागासवर्गीय/विजाभज/अपंग/अनाथ तसेच गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृहाचे अधिक्षक श्री.लोखंडे सर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.वसतिगृह प्रवेशासाठी अर्जासोबत डोमेसाईल दाखला, गुणपत्रक, सन 2024-25 चा पालकांचा उत्पन्नाचा दाखला ( तहसिल कार्यालयाकडील), जातीचे प्रमाणपत्र, आधारकार्ड प्रत, रहिवासी दाखला, बँक पासबुकची पहिल्या पानाची प्रत, शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाईड/शैक्षणिक शुल्क भरणा पावती, दिव्यांग प्रमाणपत्र (असल्यास), अनाथ प्रमाणपत्र (असल्यास), गॅप सर्टिफिकेट (गॅप असल्यास) व रेशनकार्ड प्रत इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. वसतिगृह पात्र विदयार्थ्यांना सर्व सोयी-सुविधा, निवास, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण हे विनामुल्य आहे. याव्यतिरीक्त निर्वाह भत्ता प्रतिमाह रूपये 500 हा विदयार्थ्यांना दिला जातो, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद केलेले आहे.
