
. नांदगाव (प्रतिनिधी ) शुक्रवार दि.१३ जून संध्याकाळी सुमारे ६:३० वाजण्याच्या सुमारास नांदगाव लगत एका मोटरसायकलला अपघात झाला. या भीषण अपघातात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून दुसऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.अपघातग्रस्त दोन्ही व्यक्तींना तातडीने नांदगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. घटनास्थळी उपस्थित भागवत झाल्टे यांनी तत्परतेने निर्णय घेत, नांदगाव मतदारसंघाचे लोकप्रिय व दमदार आमदार मा. सुहास अण्णा कांदे यांच्या उपलब्ध ॲम्बुलन्स सेवेचा लाभ घेतला. त्यांच्या सेवेमुळे अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळू शकली.सध्या गंभीर जखमी झालेल्यावर उपचार सुरू असून दुसऱ्या व्यक्तीच्या ओळखीबाबत पोलीस तपास सुरू आहेत. नागरिकांना अपघातस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या घटनेनंतर पुन्हा एकदा आमदार सुहास कांदे यांच्या ॲम्बुलन्स सेवेची तत्परता आणि कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.
