
ओझर:(प्रतिनिधी ) दिल्ली येथे ओपन ग्रँडमास्टर इंटरनॅशनल बुद्धिबळ स्पर्धेत ब गटात सुमारे 861 खेळाडू पैकी आंबे दिंडोरीच्या धनश्री अनिल राठी हिने 13 वा क्रमांक मिळवून रोख रुपये 50,000 व सोबत डिजिटल घड्याळ व 20 पॉईंटने इन्क्रिमेंट झाले, तसेच तिची लहान बहीण तनिष्का अनिल राठी हिचेही 50 पॉईंटने आंतरराष्ट्रीय रेटिंग वाढले ती 11 वी ला केटीएचएम कॉलेज डिलिजन्टची विद्यार्थिनी आहे. धनश्रीचा सत्कार दिल्ली येथे भव्य दिव्य ग्रँड मास्टर दिवेंद्र बरुवा वेस्ट बंगोल यांच्या हस्ते झाला. यांच्या यशात आई शितल राठीचा सिंहाचा वाटा आहे. राठी भगिनी ईशान चेस अकॅडमी अमित गंगाधर तारे, विनोद भागवत बुद्धिबळ कोच यांचे मार्गदर्शन लाभले. या कामगिरी निमित्त नासिकचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुधाकर मोरे सर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हर्षल नेहते सर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र लोणे सर, युवराज देवरे सर, राजेंद्र बागुल सर, जिल्हा क्षयरोग अधिकारी रवींद्र चौधरी सर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुजित कोशिरे सर, प्रा आ के वैद्यकीय अधिकारी आनंद सुर्वे, डॉ वैशाली कदम , प्राची पवार, योगेश धनवटे, गंगाधर तारे, अमोलजी कलंत्री, प्रथमेश धर्माधिकारी, रवींद्र देवरे,अरिफ मन्सूरी, आंबे दिंडोरी सुभाष वाघ हिवताप पतसंस्था संचालक पल्लवी कुलकर्णी, के टी एच एम चे जे टी शिंदे,काळे सर, किशोर बावा, उमेश ताठे, सूरज हारगोडे, संतोष लढढा, संजय सारडा माहेश्वरी समाज ओझर, प्रा आ के ओझर स्टाफ, नासिक जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
