
नाशिकरोड:-(प्रतिनिधी )शिखरेवाडी येथील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेचा सतरावा वर्धापनदिन नुकताच मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांचे आयोजन करत संपन्न झाला. महिला आणि पुरुष सभासदांनी पाककला तसेच नैसर्गिक पानाफुलांच्या पुष्परचना स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पुष्परचना स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक अनुक्रमे सुनंदा गोसावी आणि प्रदीप भालेराव यांनी तर पाककला स्पर्धेत वैजयंती चंद्रात्रे आणि कल्पना गोखले यांनी अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला. पुष्परचना स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुधाकर सोनवणे आणि ॲड.गोविंद पांडे यांनी तर पाककला स्पर्धा परीक्षक म्हणून शिल्पा वैद्य आणि सदानंद पालकर यांनी काम पाहिले. संस्थेचे अध्यक्ष जयराम कुलकर्णी यांनी परिक्षक आणि स्पर्धकांचा सत्कार केला. दुसऱ्या भागात अध्यक्ष जयराम कुलकर्णी, उपाध्यक्ष सुरेश पारुंडेकर, सचिव अविनाश गोसावी, आधारस्तंभ वसंत उपासनी, राम कुलकर्णी यांनी दीपप्रज्वलन केले. उपाध्यक्ष सुरेश पारुंडेकर यांनी संस्थेच्या २००८पासूनचा प्रगती अहवाल आणि संस्थेच्या ग्रंथालयाच्या विस्ताराविषयी माहिती दिली. अध्यक्ष कुलकर्णी यांनी आज संस्थेचा सर्वांगाने झालेला विकास मनात कृतकृत्यतेची भावना सदैव ठेवणारा असल्याचे सांगून मागे वळून पाहताना आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्रकाश भालेराव, मेखला रास्वळकर आणि सुप्रिया बनसोड यांनीकार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार शरद वैद्य, उपखजिनदार परमेश्वर चिंतकिंदी, अनिल सहस्रबुद्धे, प्रदीप भालेराव, गोविंद पांडे, चांगदेव बोराडे, सुधाकर सोनवणे, प्रकाश भालेराव, वैदेही कुलकर्णी, अर्चना सहस्त्रबुद्धे, कल्पना गोखले, ज्योती जोशी, रेखा नाशिककर, माधवी कुलकर्णी, पद्मा देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. वैजयंती चंद्रात्रे यांनी सूत्रसंचालन केले. प्रार्थना मंगल मोहरील यांनी सादर केली. सुनंदा गोसावी यांनी निवेदन तर मंगल मोहरील यांनी आभार मानले.
