
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३४ वा दिवस
इजिप्तचा अभ्यास करणाऱ्याला ज्याप्रमाणे इजिप्तबद्दल जिव्हाळा वाटतो, त्याप्रमाणे एखाद्याला भारताबद्दल जिव्हाळा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु हा जिव्हाळा स्वार्थाने भरलेला असतो. आपण अभ्यासिलेल्या पुस्तकात वर्णिलेला भारत, आपण ज्याची स्वप्ने आपल्या मनाशी रंगविली आहेत तो दैदिप्त्यमान भारत पुनः पहायला मिळावा अशी एखाद्याला इच्छा होणे शक्य आहे. परंतु माझी अशी इच्छा आहे की प्राचीन भारताचे जे विशेष गुण होते त्यात आधुनिक युगाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांची भर पडावी आणि अशा रीतीने भारताचे पूर्वीचे गुण सहज रीतीने बळकट व्हावे. भारताचा आतूनच विकास होऊन आधुनिक नवभारत निर्माण व्हावयास हवा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २२ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ वद्य /कृष्ण १
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. १२ जून २०२५
★ १९०५ नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक संघांची स्थापना केली.
★ २००० सुप्रसिध्द मराठी लेखक, अभिनेते, विनोदवीर, महाराष्ट्रचं लाडक व्यक्तीमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पु. ल. देशपांडे यांचा
★ जागतिक बालकामगार विरोधी दिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
