
मंत्र (प्रतिनिधी ): मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने व पू.संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य देवदर्शन पदयात्रेत सहभाग घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त, ही पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आयोजित श्री शिवराज्याभिषेक अर्थात हिंदूसाम्राज्य दिन सोहळा निर्मित देवदर्शन पदयात्रा ही श्री शिवप्रतिष्ठान आंबेगाव तालुक्याच्या वतीने शिंगवे,पारगाव,काठापूर,जारकर वाडी,लोणी,वाळूजनगर,खडकवाडी,मेंगडेवाडी,निरगुडसर,जवळे,मंचर,अवसरी,रांजणी,वळती ह्या मार्गे आयोजन करण्यात आले होते.मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक,पूजा आणि पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. हिंदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करणं हे आपल्या इतिहासाच्या स्मरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व त्यांच्या कार्याची ओळख लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य पू.भिडे गुरुजी करत आहेत.तसेच छत्रपती संभाजी महाराजांचा त्याग व बलिदान देखील प्रत्येकाच्या मनात जागवण्याचं कार्य ते निःस्वार्थपणे करत आहेत.या पवित्र दिवशी शिवभक्तांच्या उत्स्फूर्त सहभागातून शिवरायांप्रतीचा आदर,श्रद्धा आणि आपुलकी दिसून आली.जय भवानी! जय शिवाजी!
