
डावीकडून कवी साताप्पा सुतार सर्जेराव हळदकर, मा. सचिन खराडे, पीएसआय एन. आर. चौखंडे, आदर्श माता श्रीमती नंदिनीताई कदम, कवी रामचंद्र कांबळे
हुपरी (वार्ताहर )मारूती जाधव यांचेकडून येथील कल्लाप्पाआण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण संपन्न झाले. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कवी, गुणवंत कामगार साताप्पा सुतार महाराष्ट्र शासन यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष वाटप कार्यक्रम आयोजित केला होता. या यावेळी हुपरी पोलीस स्टेशनचे पीएसआय मा. एन.आर. चौखंडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वाढते औद्योगीकरण आणि जंगलतोडीमुळे पर्यावरणातील प्राणवायूचे प्रमाण दिवसेंदिवस घटत असून आपल्यासाठी आणि पुढील पिढ्यांच्या संवर्धनासाठी वृक्षलागवड करणे काळाची गरज आहे. यावेळी मान्यवरांच्या आणि नागरिकांच्या उपस्थित कवी, गुणवंत कामगार यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. इचलकरंजी कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय अधिकारी मा. सचिन खराडे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, वृक्षमित्र कवी सातापा सुतार यांचे काम कौतुकास्पद आहे. स्वतःचा वाढदिवस जागतिक पर्यावरणदिनाचा कार्यक्रम घेऊन करतात. पर्यावरणाच्या समतोलासाठी सुरू असलेले त्यांचे काम भावी पिढ्यांसाठी आदर्शवत व कौतुकास्पद आहे. तर सर्वच नागरिकांनी भविष्याचे संकट ओळखून प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन यावेळी कवी साताप्पा सुतार यांनी केले.यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखाना हुपरी इंटक अध्यक्ष सर्जेराव हळदकर, आदर्श माता श्रीमती नंदिनीताई कदम, पत्रकार शिवाजी येडवान, साहित्यिक एम. एस. जाधव, कवी रामचंद्र कांबळे व कार्यक्रम आयोजक कवी गुणवंत कामगार महाराष्ट्र शासन स्वतः साताप्पा सुतार उपस्थित होते. सुतार यांच्या वृक्षारोपण, साहित्य आणि पक्षीप्रेम या कामाची दखल घेत साहित्य पंढरी समुहाच्या वतीने त्यांचा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त *संत तुकाराम पुरस्काराने* सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांना आणि नागरिकांना वड, पिंपळ, फणस, लिंब, चिंच, आंबा, पेरू तसेच फुलांचे वृक्षरोपे भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सर्जेराव हळदकर यांनी केले तर शिवाजी एडवान यांनी आभार मानले.
