
नाशिक ( प्रतिनिधी)ड्रीम कॅस्टेल सिग्नल येथे पोलीस उभे राहत असल्याने अनेक वाहने हानुमांनवाडी येथील छोट्या कॉलनी रस्त्याने भरधाव वेगाने वाहत असल्याने परिसरातील लहान मुले,महिला, व ज्येष्ठ नागरिकांना घराच्या बाहेर पडणे देखील अवघड झाल्याने सदरील परिसरात ब्यारेकेटिंग लावण्यात येवून स्पीड ब्रेकर टाकने कामी मनपा अधिकाऱ्यांना परवानगी द्यावी यासाठी चे निवेदन पोलीस सह.आयुक्त श्री.चंद्रकांत खांडवी यांना देण्यात आले. तसेच गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर हे विविध समस्यांनी ग्रासलेले असून नाशिक शहरात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी हजेरी लावली मात्र नाशिक शहरातील रस्त्यांची झालेली चाळण,पंचवटीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तसाच आहे.नाशिक शहरात येत्या काही दिवसात कुंभ मेळ्याच्या नावाने मोठ्याप्रमाणावर निधी मिळणार असून सदरील निधी केवळ खाजगिकरनावर व कंत्राटदारांवर खर्च न करता नागरी सुविधांवर खर्च करावा,ड्रीम कॅस्टेल सिग्नल ते मखमलाबाद रस्त्याचे व त्याभोवती असणाऱ्या कॉलनी रस्त्यांचे दुरुस्तीची कामे त्वरित सुरू करावीत,श्रीकृष्ण नगर,महादेव बाग,सत्यदेव नगर,समर्थ नगर,अनुसया नगर आदी परिसरातील रस्त्यांची कामे मार्गी लावावी,नवनाथ नगर,रॉयल टावून,विद्या नगर,अनुसया नगर,समर्थ नगर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. हानुमांनवांडी, मोरे मळा, मधुबन कॉलनी, गुलमोहर आपा.येथे स्पीड ब्रेकर्स टाकावे. आदी मागण्यांचे निवेदन शहर अभियंता अग्रवाल यांना राष्ट्रवादी कँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष ॲड.सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने दिले.यावेळी
