
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३३ वा दिवस भारताचे पुनरुत्थान घडवून आणावयाचे असल्यास आपणाला सर्वसामान्य लोकांत शिक्षणाचा प्रसार करावा लागेल. सामान्य जनतेने हरवलेल्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पुनःप्राप्ती आणि विकास करण्याचे शिक्षण त्यांना देऊनच आपण त्यांची सेवा करू शकू. शिक्षणातून त्यांच्यात निरनिराळ्या ध्येयांचा प्रसार करावयास हवा. त्यांच्या भोवतालच्या जगात घडणाऱ्या नानाविध घडामोडींचे ज्ञान एकदा त्यांना करून दिले म्हणजे स्वतःच्या उद्धाराचा मार्ग ते स्वतःच चोखाळतील. प्रत्येक देशाने, प्रत्येक माणसाने, प्रत्येक स्त्रीने आपल्या उद्धाराचा मार्ग स्वतःच चोखाळला पाहिजे. त्यांना विचार आणि कल्पनाच फक्त पुरवा. एवढीच मदत त्यांना हवी आहे. बाकी साऱ्या गोष्टी परिणामरूपाने आपोआपच घडतील. स्वामी विवेकानंद… ●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २१ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. ११ जून २०२५
★ संत कबीर जयंती
★ १८८१ लोकमान्य टिळकांनी “मराठा” हे इंग्रजी भाषेतील दैनिक सुरु केले.
★ १८८५ पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना.
★ १८९७ भारतीय स्वातंत्र्यसैनिक व क्रांतिकारक राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्मदिन
★ १९५० सुप्रसिध्द बालसाहित्यीक, “शामची आई” पुस्तकाचे लेखक, समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक पांडूरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांचा स्मृतीदिन.
