११ जून राष्ट्र संत कबीर यांची जयंती तसेच महाराष्ट्र ची माऊली साने गुरुजी यांचा ७५वा स्मृतिदिनानिमित्त महामित्र परिवार,राष्ट्र सेवा दल व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथील शिवाजी महाराज चौक येथे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले

.साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.*या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते” खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” असं म्हणणारे साने गुरुजी उर्फ ‘ “पांडूरंग सदाशिव साने”हे केवळ समाजसुधारक, लेखक किंवा शिक्षक नव्हते तर ते विचारांनी विज्ञानवादीही होते.त्यांच्या लेखणातआणि विचारांतून त्यांनी अंधश्रद्धा जुन्या रूढी परंपरा जातिभेद यांचा नेहमीच विरोध केला आणि समाजाला बदलाची वैज्ञानिक दृष्टीकोणाची गरज पटवून दिली. साने गुरुजी यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांनी इ स १९३० साली शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेऊन त्यांनी ” काँग्रेस ” नावाचे साप्ताहिक काढले. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ ल्या उपोषण केले आणि त्यांना प्रवेश मिळवून दिला.

“बलसागर भारत होवो विश्वात शोभोनी राहो ” अशी काव्य रचना करणारे साने गुरूजी यांचा ११ जून १९५० रोजी मृत्यू झाला अशा महान महापुरुषाला विनम्र अभिवादन !तसेच राष्ट्रसंत कबीर महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. संत कबीर हे समाज सुधारक संत होते त्यांनी धार्मिक थोतांडावर कडक आसूड ओढणारे आणि हजारो ग्रंथांचे पांडित्य खुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराचा मंत्र सांगणारे पुरोगामी संत होते. त्यांनी तत्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मांतील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टिका केली. संत कबीर हे सत्य विज्ञान व कर्म सिद्धांत यांवर लिहीत असत त्यांच्या लिखाणामुळे ते जगामध्ये प्रसिद्ध झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर यांना गुरु मानले.अशा या महान संतास विनम्र अभिवादन !*या कार्यक्रमाचे सुञसंचलन रामु इदे,प्रास्ताविक अजय शिंदे, तर आभार विजय मुठे यांनी मानले*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे संस्थापक रामभाऊ इदे सहसंस्थापक विजय मुठे,अजय शिंदे, दिनकर काळे,अनिल वेॅद्य, सुधिर ब्राम्हणी,दिलीप वारुंगसे,अण्णा काकड,बापु चव्हाण, भगवान पाचोरे, प्रकाश माळी,धनंजय परदेशी, राजेंद्र देशमुख, मनोज माळी,गोपीनाथ वाजे आदि उपस्थित होते
