
. इगतपुरी (प्रतिनिधी)इगतपुरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाला मोठे भगदाड पडले असुन काँग्रेसचे प्रदेश सचिव भास्कर गुंजाळ व उत्तमराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात पक्षप्रवेश घेतला मुंबई येथील कार्यालयात प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री ना गिरीष महाजन, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला दरम्यान एन एस यु आय या विध्यार्थी संघटनेपासुन विविध पदांवर कार्यरत असणारे गुंजाळ हे विविध आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यात परिचित आहेत विधानसभा निवडणूक 2009,2014,2019 या निवडणुकामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांच्यासह या सर्व कार्यकर्त्यांची मोलाची भूमिका होती मात्र गत विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याबाहेरील उमेदवार पक्षाने लादल्याने सर्व काँग्रेसजन यांची पक्षावर नाराजी झाली व हि सर्व मंडळी अपक्ष उमेदवार निर्मला गावित यांच्या सोबत प्रचारात सक्रिय होती मंत्री गिरीश महाजन व जिल्हाध्यक्ष सुनिल बच्छाव यांच्याशी सुमारे दोन आठवड्यापासुन संपर्कात असलेल्या ह्या पदाधिकाऱ्यांनी शेवटी हा प्रवेश घेतला यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष किरण पागेरे,देवळे सोसायटी चेअरमन योगेश सुरुडे, सेवादल अध्यक्ष दिलीप पाटील, इगतपुरी शहराध्यक्ष उत्तम सोनवणे,युवक काँग्रेस अध्यक्ष सुरज हंडोरे,आहुर्ली सोसायटी मा चेअरमन मधुकर गायकर, धामणी सोसायटी मा चेअरमन अशोक भोसले,मा संचालक दिलीप भोसले, गटप्रमुख बाजीराव गावंडे,सामाजिक कार्यकर्ते जे के मानवेढे,तुकाराम कोकणे, विष्णु कोकणे,नामदेव कोकणे, रमेश कोकणे,गोरखशेठ मराडे, यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केलायाप्रसंगी मंडल अध्यक्ष भाऊसाहेब धोंगडे, अण्णा पवार, प्रदेश नेते महेश श्रीश्रीमाल, अण्णा डोंगरे भाऊसाहेब कडभाने, किरण फलटणकर, कैलास चौधरी, कैलास कस्तुरे अनिल चौधरी, अनिल परदेशी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी त्यांच्या स्वागताला हजर होते
