
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९३१ वा दिवस
अद्वैत तत्वज्ञान हे दैनंदिन जीवनातले काव्य बनले पाहिजे. गुंतागुंतीच्या निरर्थक पुराणातून बाहेर पडून ते ठोस नैतिक शिकवणुकीच्या स्वरुपात प्रकट झाले पाहिजे. मती गुंग करणाऱ्या योगशास्त्रातून बाहेर येऊन ते शास्त्रीय आणि व्यवहारिक मानसशास्त्राच्या स्वरूपात असे काही प्रकटले पाहिजे की ते लहान मुलांना देखील सहजपणे समजले पाहिजे. हा माझ्या जीवनाचा हेतू आहे आणि त्यासाठीच मी माझे संपूर्ण जीवन समर्पित करण्यासाठी सिध्द आहे. आपल्या देशबांधवांना जागृत केल्याखेरीज देशाचे पुनरुत्थान अशक्य आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १९ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. ९ जून २०२५
★ १७८१ ब्रिटिश सिव्हिल व मेकॅनिकल अभियंता, आगगाडीचा जनक जार्ज स्टिफन्सन यांचा जन्मदिन.
★ १८९० गिरणी कामगारांची रविवारी साप्ताहिक सुट्टीची मागणी मान्य होऊन साप्ताहिक सुट्टीस प्रारंभ.
★ १९०० आदिवासी जननायक स्वातंत्र्यसैनिक वीर बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेत संशयास्पदरित्या मृत्यू. स्मृतीदिन.
