
नाशिक ( प्रतिनिधी):काळीज माझं साहित्य सामाजिक संस्था,छत्रपती संभाजीनगर आयोजित नाशिक येथील साहित्य संमेलनात नाशिकचे जेष्ठ कवी तसेच म.वि.प्र.समाज,नाशिकचे सेवानिवृत्त प्रबंधक,सेवक सोसायटीचे माजी संचालक व निवृत्त सेवक संघाचे सचिव माणिकराव गोडसे यांना साहित्य,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नुकताच *जीवनगौरव* पुरस्कार मा.चंद्रकांत दादा वानखेडे,राधिकाताई मखमले,सुरेश पवार,गुलाबराजा फुलमाळी,शारदा भामरे,रविंद्र मालुंजकर,सुरेखा ताई बेंद्रे आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरविण्यात आले. श्री गोडसे यांना यापूर्वी अनेक जिल्हा,राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाले असून विविध साहित्य संमेलनात कवी संमेलनाध्यक्ष,प्रमुख अतिथी,निमंत्रित म्हणून सतत सहभागी होत आहे.त्यांचे सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे..
