
नांदगाव ( प्रतिनिधी ) नमन एज्युकेशन संचलित लिटिल स्टार इंग्लिश मीडियम स्कूल व रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये ढोल ताशांच्या उत्साहाच्या गर्जातसर्व विद्यार्थ्याचे जल्लोषात स्वागत.. शाळा उत्तम संस्कार..
शाळा ज्ञानाचे भांडार.. गुरू शिष्याचे माहेरघर.. शाळा विद्येचे मंदिर ||
नित्य असावा मनी ध्यास.. मुळात विद्यार्जनाची आस.. जिथे सद्गुरु तिथे ज्ञान..
साक्षात सरस्वतीचा वास ||

दिनांक ०९ जून रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री.संजय बागूल सर व उपाध्यक्ष सौ.सरिता बागूल मॅम यांच्यातर्फे स्वागताचे विशेषनियोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष,स्कूलचे प्रिन्सिपल मिस. वासंती नटराजन मॅम सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात रिबिन कटींगने मा.मॅनेजमेंट आणि स्कूलचेप्रिन्सिपल यांच्या हस्ते करण्यात आले.नंतर सर्व विद्यार्थ्याचे स्वागत ढोल ताशांच्या गर्जात करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे पूजन करून मनसोक्त डान्स ढोल ताशाच्या समवेत केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस अनिता जगधने यांनी अतिशय सुंदररित्या केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी या सर्वानी खूप मेहनत घेतली.आज स्कूल मध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण होते.
