
सिन्नर (प्रतिनिधी)०९ जून २०२५जननायक क्रांतिसुर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १२५ व्या शहीद दिनानिमित्त आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड,महामिञ परिवार अखिल भारतीय विकास परिषद सिन्नर आदिवासी कोळी महादेव जमात संघटना सिन्नर यांच्या,वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामित्र दत्ता वायचळे होते. जननायक धरतीआबा भगवान बिरसा मुंडा यांनी गोरगरीब आदिवासी जनतेच्या जल जमीन जंगल यांच्यावरील हक्क अधिकारासाठी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षांपर्यंत जमीनदार,सावकार,ब्रिटिशां विरोधात उलगुलान आंदोलन करून मोठी लढाई लढली हि आजच्या तरूणांसाठी देशासाठी प्रेरणादायी बाब आहे.भगवान बिरसा मुंडा यांनी ब्रिटीश सरकार विरुध्द आदिवासींच्या अस्तीत्वाची मोठी लढाई लढली.ब्रिटीश सरकारने वन कायदा केल्यामुळे आदिवासींचे वनसंपत्ती वरील हक्क काढले गेले.

त्यामुळे अनेकांना बेघर व्हावे लागले लोकांवर उपासमारीची वेळ आली वन कायदा मागे घ्यावा म्हणुन न्यायालयामध्ये याचिका दखल केली परंतु न्यायालयाने ती फेटाळली त्यामुळे आदिवासींमध्ये असंतोष पसरला.१८९४ साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला होता.उपासमारी महामारीमुळे अनेक माणसं मरण पावली.इंग्रज सरकारने अवाजवी शेतसारा वसुली सुरू केली.सरकारने सावकार,जहागिरदार,जमिनदार यांच्या मार्फत आदिवासींचे शोषण,जुलूम,अत्याचार चालु केले.त्या विरोधात बिरसा मुंडाने आदिवासींना एकञित करून त्यांना त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची जाणिव करून दिली.बिरसाने ब्रिटीश सरकार विरोधात “उलगुलान” आंदोलन सुरू केले.जल,जमिन,जंगल यांच्यावर आदिवासींचा अधिकार आहे तो तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही.असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले.बिरसा मुंडांच्या नेञुत्वाखाली आदिवासींनी धणुष्यबान,भाले इत्यादी हत्यारांनी अनेक लढाया लढल्या ब्रिटीश सरकारकडे अत्याधुनिक शस्रास्रे होती तरी देखिल १८९८ मध्ये तांगा नदीच्या काठी बिरसा मुंडांनी ब्रिटीश सैन्याला हरविले परंतु अतिरीक्त सैन्य आल्यामुळे आदिवासींना रोकण्यात यश आले या लढाईत ४००चे वर आदिवासी शहिद झाले.बिरसा मुंडा डोमबाडी पहाडांमध्ये आदिवासी जनतेला मार्गदर्शन करत असताना ब्रिटीश सैन्याने त्यांच्यावर हल्ला चढविला आदिवासी व ब्रिटीश्यांमध्ये तुफान लढाई होऊन अनेक जन शहिद झाले तर बिरसा मुंडा सहित अनेकांना जेरबंद केले.बिरसा मुंडांना रांचीच्या कराग्रुहात आणुन एका कोठडीत ठेवले.त्यांनी अन्नत्याग केला रक्ताची उलटी होऊन वीर मरण आले.बिरसा मुंडा देशासाठी आदिवासींच्या हक्कासाठी शहिद झाले.बिरसा मुंडांच्या आंदोलनामुळेच आदिवासी जमिन कायदा निर्माण झाला.बिरसा मुंडांच्या आंदोलनामुळेच महात्मा गांधींना प्रेरणा मिळाली.आदिवासींमध्ये स्वत:च्या अस्तित्वाची,अस्मीतेची,संस्क्रुतीची जाणिव बिरसा मुंडांनी करून दिली अशा महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन!..या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कॉम्रेड हरिभाऊ तांबे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जिवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे प्रास्ताविक रामु इदे तर आभार दिनेश लोंढे यांनी मानले. यावेळी महामित्र दत्ता वायचळे,कॉम्रेड हरिभाऊ तांबे,माजी नगरसेवक रुपेशभाऊ मुठे,आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामुदादा इदे, सहसंस्थापक विजयभाऊ मुठे,संदिप मुठे, दिनेश लोंढे, मधुकर सोनवणे,किरण मुठे, रामदास कुटे आदि.उपस्थित होते.
