
चांदवड ( प्रतिनिधी ) नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानडगाव परिसरात पावसाचे जोरदार वादळी वाऱ्यासह पुनरागमन झाले. सुरुवातीला हलक्या सरी पडल्या मात्र त्या नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे कानडगाव येथील जगताप वस्तीवर पावसामुळे मोठे नुकसान झाले असून राघू मोतीराम जगताप यांच्या तीन शेळ्या मृत्युमुखी पडल्या व एक शेळी जखमी झाली. दशरथ जगताप यांचा गोठा उघडून गेला आणि रुक्मिणीबाई जगताप या जखमी झाल्या. याची माहिती चांदवड तहसीलदारांना मिळताच त्यांनी तलाठी यांना पंचनामाचे आदेश दिले. तलाठी जयश्री क्षीरसागर यांनी कानडगाव येथील नुकसानीचे पंचनामे केले. परंतु शासनाने या नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त नागरिकांनी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील कानडगाव परिसरात दिनांक 7 जून 2025 रोजी शनिवारी जोरदार वादळी वारा पावसाचे आगमन झाले सुरुवातीला हलक्या स्वरूपाच्या सरी पडल्या. मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला. बऱ्यापैकी पाऊस झाला. गारवा निर्माण झाल्यामुळे उखाड्याने गरम झालेल्यांना दिलासा मिळाला. गेल्या आठ दिवसापासून पावसाने दडी दिल्यामुळे प्रश्न त्याचा पारा वाढला होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी झाडे कोसळले. तर अनेक ठिकाणी लावण्यात आलेली डिजिटल बोर्ड पडले. तसेच चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील जगताप वस्ती परिसरात देखील जोरदार वादळ वारासह पाऊस झाला. त्यामुळे राहू मोतीराम जगताप यांच्या तीन शेळ्या मरण पावल्या व एक शेळी जखमी झाली. दशरथ जगताप यांचा गोठा उडून गेला. रुक्मिणीबाई जगताप या जखमी झाल्या आहेत. सदर घटनेची माहिती चांदवड तहसीलदार यांना मिळताच त्यांनी तालुक्यांना पंचनामा करण्याचे आदेश तलाठी जयश्री क्षीरसागर यांनी कानडगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्तांची पाहणी करून पंचमी केले. मात्र त्यांच्याकडे पंचनामेची नक्कल मागणी केली असता त्यांनी पंचनामेची नक्कल देण्यास टाळ केली. उलट सुलट चर्चांना विधान आले आहे. तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने लवकर लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तासह नागरिकांनी केली आहे.
