
ठाणे (प्रतिनिधी )ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघनेने दिनांक 2 जून 2025 पासून 12 व 24 वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांचे सेवांतर्गत प्रशिक्षण आपल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण व ठाणे या केंद्रांवर सुरू आहे. सदर प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा व भेट देण्यासाठी तसेच संघटनेचे कार्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार दिनांक 8 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वा. के. सी. गांधी विद्यालय, कल्याण येथे तर 12.00 वा. बी. के. बिर्ला कॉलेज, कल्याण* येथे *माध्यमिक व उच्च माध्यमिक/ कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थींना भेटून त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते सोडवण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील असे आश्वासन संघटनेच्या वतीने शिक्षकांना देण्यात आले. त्याचबरोबर मा.रा.क.मा.शिक्षक महासंघ व जिल्हा संघटना शिक्षकांच्या हितासाठी कशा प्रकारे प्रयत्न करीत आहेत त्या संदर्भातली माहिती शिक्षकांना देण्यात आली.

तसेच दि. 13 जून 2025 रोजी मुंबई विभागीय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने शिक्षण उपसंचालक मुंबई यांच्या विरोधात आयोजित केलेले जेलभरो आंदोलनासाठी* मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ठाणे जिल्हा क. मा.शिक्षक संघटनेचे *अध्यक्ष प्रा. सुरेश अहिरे* यांनी केले. तसेच डायचे जिल्हा समन्वयक श्री. संजय वाघ साहेब यांची भेट घेऊन प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्यां सोडविण्याबाबत विनंती केली. आजच्या सदिच्छा भेटीसाठी ठाणे जिल्हा संघटनेचे *अध्यक्ष- प्रा. सुरेश अहिरे सर, कार्याध्यक्ष- डॉ. प्रकाश माळी सर, उपाध्यक्ष- डॉ. किरण पाटील व प्रा. हनुमंत लोहार, सहसचिव- प्रा. योगेश दाखले व योगेश धीवरे, उल्हासनगर ता. अध्यक्ष – प्रा. प्रदीप फापाळे, भिवंडी तालुकाध्यक्ष- प्रा. अजित भोईर सर आणि सहकारी शिक्षक प्रा. केतन शेवाळे* आणि इतर पदाधिकारी दोन्ही प्रशिक्षण केंद्रांना भेटी देण्यासाठी उपस्थित होते.
