
नांदगाव (प्रतिनिधी)पावसाळ्यातील अस्वच्छता आणि डासांमुळे वाढणाऱ्या आजारांचा धोका डेंगू सदृश्य आजाराने दोघांचा मृत्यू ?नांदगांव यावर्षी पावसाळा लवकर सुरू झाल्याने नांदगाव शहर आणि परिसरामध्ये ठीक ठिकाणी पाणी साचून गटारी तुंबून डास आणि मच्छर ची उत्पत्ती वाढलेली आहे त्यासोबत माशाची देखील दुर्गंधी वाढत चालली आहे सर्व बाजूने दुर्गंधी वाढ त चालल्याने डेंगूंचे रुग्ण वाढत चालल्याचे तक्रारी नागरिक करत आहे याकडे नांदगाव पालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे नांदगाव शहरात डेंगूसदृश्य आजाराने दोघांचा मृत्यू झाल्याने आरोग्य संदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.पावसाळा सुरु होताच शहरांमध्ये अस्वच्छतेची समस्या डोके वर काढते. रस्त्यांवर साचलेले पाणी, तुंबलेले नाले, उघड्यावर पडलेला कचरा आणि त्यातून निर्माण होणारी दुर्गंधी ही परिस्थिती नागरिकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू लागली आहे.या अस्वच्छतेमुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढतो. डासांच्या वाढीस पोषक ठरणारे हे साचलेले पाणी डेंगू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाच्या आगमनानंतर काही आठवड्यांतच विविध रुग्णालयांमध्ये डेंगू आणि सदृश्य आजारांचे रुग्ण दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.शहरांमध्ये अनेक भागांत गटारांची सफाई न झाल्याने पावसाचे पाणी तुंबते. साचलेल्या पाण्यात अळ्या वाढतात आणि काही दिवसांतच डासांची संख्या झपाट्याने वाढते. या डासांमुळे अनेक कुटुंबांना जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यातच दुर्गंधीमुळे वातावरण असह्य बनते. नागरिकांना घरात राहणेही कठीण होते.स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका आणि आरोग्य विभाग यांनी वेळेवर स्वच्छता मोहीम, नाल्यांची सफाई, कीटकनाशक फवारणी यासारखी उपाययोजना न केल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. लोकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता ठेवणे, पाणी साचू न देणे, डास प्रतिबंधक उपाय करणे गरजेचे आहे.नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ही केवळ प्रशासनाची नसून सर्वांचीच आहे. शहर स्वच्छ ठेवले तरच आजारांपासून सुरक्षित राहता येईल. अन्यथा पावसाळा हा सौंदर्याचा ऋतू नसून त्रासदायक काळ ठरू शकतो.दरम्यान नांदगाव शहरातील धनगर वाड्यातील रहिवासी असलेले कृष्णा तानाजी चव्हाण हे शेतकरी दिनांक 6 / 6/25 रोजी डेंगू आजारांनी निधन झाल्याचे त्यांचे कुटुंबीयांकून सांगण्यात येते. नांदगाव शहरांमध्ये डेंगूंची उत्पत्ती आणि रुग्णांची संख्या वाढत आहे मे महिन्यात पाऊस पडला स्वच्छतेचे कमांड दिलेले आहे हे फक्त रस्त्यावरच साफसफाई केली जाते परंतु गल्लीबोळात फारशी सफाई होताना दिसत नाही डेंगूसदृश्य साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होत असतानाही प्रशासनाकडून कोणतीही फवारणी न केल्याने डासांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यामुळे दवाखान्यात गर्दी वाढत आहे परंतु शासनातर्फे यावरती कोणत्याही उपाय योजना केल्या जात नाही अशी मौखिक तक्रार स्थानिक नागरिक करतात प्रत्येक रस्त्यावर मोकाट जनावरांची शेण पडलेला असते त्यामुळे दुर्गंधी पण प्रमाण वाढलेली आहे ठिकठिकाणी उकिरडे कचऱ्याची डेपो पडून असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी माशा तर प्रमाणातच आहे शिवाय डास आणि मच्छर आणि त्यासोबत डेंगूची देखील उत्पत्ती वाढत चालली आहे यावरती जालीम उपायांची गरज असल्याचे नागरिक सांगतात दरम्यान नांदगाव शहरातील एक पॉपकॉर्न विक्रेता देखील या डेंगूसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते. शहरातील स्वच्छता मोहीम राबवणे काळाची गरज आहे प्रशासनाने याकडे काटेकोरपणे पाऊले टाकावे अशी मागणी होत आहे.
