
कल्पकतेचं नाशिक:-(प्रतिनिधी )पंचवीस वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या गिरणा गौरव प्रतिष्ठानने विविध उपक्रमांची मांदियाळी निर्माण केली आहे. ‘पुस्तकावर बोलू काही’सारख्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवून आपली नवी ओळख निर्माण करणाऱ्या कल्पकतेचं दुसरं नाव म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठान आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ समीक्षक डॉ.दिलीप धोंडगे यांनी काढले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी पुष्पानिमित्त आयोजित खास कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, माजी सनदी अधिकारी बी.जी.वाघ, प्राचार्य प्र.द.कुलकर्णी मंचावर होते. मान्यवरांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात सहभागी झालेल्या उपस्थित साहित्यिकांपैकी काही मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरूपात उपक्रमाविषयी मनोगत व्यक्त केले. भ्रमरचे संपादक ज्येष्ठ पत्रकार चंदुलाल शहा, साप्ताहिक कुसुमाग्रज नगरचे संपादक रामदास नागवंशी, युवा पत्रकार अश्विनी पांडे यांच्यासह नाशिकमधील प्रसार माध्यमांचे संपादक आणि पत्रकार यांचा पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ‘पुस्तकावर बोलू काही’चे अध्यक्ष मधुकर गिरी, समन्वयक संजय आहेर, सोमनाथ साखरे, अलका दराडे, सुनंदा पाटील, अशोक पाटील, अर्जुन वेलजाळी, आकाश पवार, ॲड.मिलिंद चिंधडे, राजेंद्र देसले, दत्तात्रय कोठावदे, तु.सी. ढिकले, दत्तात्रय दाणी, मुक्ता चिंधडे आदींसह गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले. गिरणा गौरव प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार यांनी प्रास्ताविक तर कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.फोटोओळी:-गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी पुष्पाप्रसंगी मान्यवर अतिथी आणि साहित्यिक.
