
नाशिकरोड:(प्रतिनिधी)- शिखरेवाडीतील स्वानंद जय साई संस्थेच्या वतीने ‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक खेळ’ या विषयावर मनोवेध डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक अमोल कुलकर्णी यांचे सप्रयोग व्याख्यान झाले. त्यांनी विविध शारीरिक हालचाली, बौद्धिक आणि मानसिक एकाग्रतेने खेळांद्वारे मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सभासदांकडून खेळ करून घेतले. डाव्या-उजव्या मेंदूच्या घटत्या कार्यक्षमतेचा ऱ्हास, ज्येष्ठांमध्ये वाढत्या प्रमाणात होणारा डिमेशिया आणि अल्झायमरचे आजार या खेळांद्वारे दूर राहण्यास निश्चित उपयोग होतो, असे त्यांनी सांगितले. मराठी-इंग्रजी संख्यांचे क्रमवार उच्चारण, राग, लोभ, द्वेष यांचे खेळांद्वारे प्रकटीकरण, गाव आणि पोस्टमन या खेळाद्वारे मेंदूच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होते, असेही ते म्हणाले. सदानंद पालकर यांनी अध्यक्षीय भाषणात या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव अविनाश गोसावी, उपसचिव रवींद्र चंद्रात्रे, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार शरद वैद्य, प्रदीप भालेराव, अनिल सहस्रबुद्धे, प्रकाश भालेराव, चंद्रकांत झाडीकर, सुनंदा गोसावी, वैजयंती चंद्रात्रे, मंगल मोहरील, शालिनी डहाळे, उषा गीत, सुधा डमरे, कल्पना वैद्य, ज्योती जोशी, अर्चना सहस्त्रबुद्धे नाईक, ज्योत्स्ना पालकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सुनंदा गोसावी यांनी त्रिवार ॐकार आणि प्रार्थना म्हटली. मृणाल प्रभुणे यांनी सूत्रसंचालनासह आभार प्रदर्शन केले.
