
साकोरा (प्रतिनिधी )दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. 6 जून 2025 रोजी मातोश्री वत्सलाबाई वाल्मीकराव तुसे बहुउद्देशीय संस्था नांदगाव व साकोरा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय, साकोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला. रा.स्व.संघ प्रणित जनकल्याण ब्लड बँक नाशिक यांच्यावतीने रक्तदानाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा व आरती करण्यात आली तसेच राजमाता जिजाऊ, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे गंध व पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. या शिबिरामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन 40 लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. एनीमिया मुक्त भारत अभियानाच्या च्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जातो.**यावेळी सरपंच किरण रमेश बोरसे, झेडपी सदस्य रमू काका बोरसे, कृ.उ. बाजार समिती मा. सभापती श्री.सतीश भाऊ बोरसे व ग्रामपंचायत सदस्य, मातोश्री वत्सलाबाई वाल्मिकराव तुसे संस्था व विवेक गोदावरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नांदगावचे स्त्रीरोगतज्ञ डॉ. हर्षद सुनील तुसे, अष्टविनायक लॅबचे संचालक अमोल हिरे, रा.स्व.संघ नांदगाव शहर उपखंडप्रमुख अतुल जोशी, जनकल्याण ब्लड बैंक नाशिकची टीम व साकोरा ग्रामस्थ उपस्थित होते.*
