
न्यायडोंगरी (जगन पाटील) राजकारणातील लोक साधू ,संत, महंत, व महापुरुषांचे नावे आपल्या भाषणातून नेहमी घेत असतात कृतीत मात्र त्यांच्या आदर्श व सद्गुणांची तसेच कर्तुत्वाची अंमलबजावणी करीत नाहीत ही सत्य परिस्थिती आहे .मी एक राजकारणी व्यक्ती म्हणून प्रामाणिक पणे कबूल करतो परंतु ॲड अनिल दादा आहेर हे मात्र राजकारणी असूनही याला अपवाद ठरले आहेत कारण त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यास एक वेगळीच किनार दिसून येत असते त्याचा प्रत्यही वेळोवेळी येत असून नस्तनपुर या पवित्र तीर्थक्षेत्रात वारकरी शिक्षण संस्था काढून त्यांनी एक आदर्श निर्माण करण्याबरोबरच आज पर्यंत फक्त देवाची आळंदी येथेच वारकरी शिक्षण दिले जात होते मात्र मागील वर्षीच्या वाढदिवसानिमित्त शनि मंदिर संस्थानने अनिलदादा यांच्या मार्गदर्शनाखाली व आकाश महाराज उगले यांच्या प्रेरणेने वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून लहान मुलांना अध्यात्मिक व वारकरी शिक्षण देण्यासाठी निवासी गुरुकुल पद्धतीने वर्ग सुरू केले

त्याचा आज पहिला वर्धापन दिन साजरा करताना वारकरी शिक्षण संस्थेतून अध्यात्मिक शिक्षण घेऊन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच त्यांना पुढील शालेय शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक साहित्य बरोबर कीर्तन भजनाचे साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले हा एक अनोखा उपक्रम राबवून अनिलदादांनी राजकारणी पुढारी फक्त साधू संतांचा उपयोग राजकारणा पुरताच करत नाहीत तर त्यांच्या प्रेरणेतून अध्यात्मिक गुणवानही तयार करू शकतात हे “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे करून दाखविले आहे असे गौरव उद्गार माजी आमदार संजुभाऊ पवार यांनी काढले ते नस्तनपुर येथे पार पडलेल्या शनेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचा प्रथम वर्धापन दिन तसेच ॲड अनिलदादा आहेर यांच्या ६७ वा अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते

यावेळी व्यासपीठावर खान्देशरत्न ह भ प तुकाराम महाराज जेऊरकर ह भ प संतोष महाराज नरोडे , ह भ प शेवरे महाराज ह भ प आकाश महाराज उगले , ॲड अनिलदादा व सौ सुनीता आहेर,माजी आमदार संजय पवार, भास्कर कदम, दिलीप इनामदार, ॲड गंगाधर बीडगर , अमीत बोरसे, रामुकाका बोरसे, किरण कांदे, फरान दादा, प्रमोद भाबड , अमोल नावंदर. इत्यादी होते तर वारकरी शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनचे पालक व अनिलदादा आहेर यांचे अभिष्टचिंतन चिंतन करण्यासाठी त्यांच्या वर प्रेम करणारे असंख्य मान्यवर महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तुकाराम महाराज जेऊरकर, अमित बोरसे, भास्कर कदम ,अमोल नावंदर, आकाश महाराज उगले, व काही विद्यार्थी यांनी संयोचित मनोगत व्यक्त केले तर सत्काराला उत्तर देताना ॲड अनिलदादा म्हणाले की ३१ वर्ष झाले मी शनी मंदिर संस्थान मध्ये विश्वस्त झालो त्यावेळेस संस्थांची फक्त एक एकर जमीन स्व मालकीची होती व त्यातच संपूर्ण मंदिराचा व परिसराचा विस्तार होता परंतु आमच्या सर्व विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने आज हे संस्थान तीस एकर जमिनीचे मालक झाले आहे ही अभिमानाची बाब असून तसा मी वाढदिवस वगैरे साजरा करण्याच्या विरोधातील आहे परंतु सर्व मित्र परिवाराने ठरविल्यानंतर यात सहभाग घेतला तेव्हा लक्षात आले की हा फक्त सोहळा नसून सर्व कार्यकर्त्यांचे व स्नेहजनांचे मनोमिलन (गेट-टुगेदर) चांगल्या प्रकारे होऊ शकते विचारांची आदान प्रदान आणि विविध सूचनाही लक्षात घेऊन पुढील वाटचाल व संस्थांचा विकास करण्याची प्रेरणा मिळत असते त्यामुळे सातत्याने दरवर्षी साजरा होणाऱ्या या अभिष्टचिंतन सोहळ्यात वेगवेगळ्या संकल्पना राबविण्याचा आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करतो त्यातीलच संकल्पनेतून येथे असलेली संपूर्ण हिरवळ सर्वांचे लक्ष वेधून घेते तसेच

मागील वर्षी सुरु केलेले वारकरी शिक्षण संस्थेतून आज सुमारे १०० हून जास्त विद्यार्थी चांगल्या प्रकारे अध्यात्मिक प्रवचन,भजन, कीर्तन ,पखवाज वादन ,अशा विविध कलागुणांनी संपन्न झाले आहे याचे मनस्वी समाधान वाटते यापूर्वी फक्त आळंदी येथेच वारकरी शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होती लवकरच नसतनपूर तीर्थक्षेत्र हेही वारकरी शिक्षनाची प्रती आळंदी करण्याचा मानस असल्याचा आशावाद व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन योगेश पाटील यांनी केले तर प्रास्ताविक राजेंद्र पाटील यांनी केले ॲड अमोल आहेर यांनी सर्वांचे आभार मानले.
