
नाशिक:(प्रतिनिधी)- शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या जीवनावश्यक गरजा भागविण्यासाठी त्यांना आर्थिक गरज लागत असते. अशा गरजा भागविण्यासाठी आर्थिक स्रोत असणाऱ्या पतसंस्था सामान्य माणसांच्या अर्थवाहिनी असतात. नाशिक तालुका कार्यक्षेत्र असणारी धनसमृद्धी नागरी पतसंस्था निश्चितच गरजूंच्या आर्थिक स्थैर्याला हातभार लावेल, असा आशावाद खा.राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केला. शिवराज्याभिषेक दिनी पळसे येथे नव्याने स्थापन झालेल्या धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे उद् घाटन खा.राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुने, नाशिक जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे, महामंत्री शरद जाधव, ज्येष्ठ नगरसेवक दिनकर आढाव, नाशिकरोड प्रभाग समितीचे माजी सभापती प्रशांत दिवे, युवानेते उदय सांगळे, भारत कोकाटे, नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेचे माजी चेअरमन निवृत्ती अरिंगळे, ज्येष्ठ संचालक जगन्नाथ आगळे, सुनील आडके, सुधाकर जाधव, गणेश खर्जुल, माझी जि.प.सदस्य संजय तुंगार, तालुका संघाचे चेअरमन शरद गायखे, पळसे गावच्या सरपंच ताराबाई गायधनी, उपसरपंच भाऊसाहेब गायधनी, माजी सरपंच नवनाथ गायधनी, दीपक गायधनी, देवीदास गायधनी, नानासाहेब चौधरी, माजी उपसरपंच किरण नरवडे, सुनील गायधनी, जाखोरीचे सरपंच नितीन कळमकर, भाऊसाहेब घोटेकर, नासाकाचे माजी संचालक पी.बी.गायधनी, कैलास टिळे, दारणेश्वर महादेव मंदिर देवस्थानमचे अध्यक्ष अनिल ढेरिंगे, फेडरेशनचे सोपान थोरात, तालुका संघाचे संचालक बबनराव कांगणे, शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव, माजी सरपंच गोरख जाधव, नानेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, उपसरपंच वासुदेव पोरजे, चांदगिरीचे माजी सरपंच रमेश कटाळे, युवा उद्योजक बापू ढमाले, पळसे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन खंडेराव गायधनी, माजी सिनेट सदस्य प्रा.शिवाजीराव गायधनी, ज्येष्ठ कामगार नेते अशोकराव जाधव, रामकृष्ण झाडे, बांधकाम व्यावसायिक मदन गायकवाड, गणपत गायधनी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजय क्षीरसागर, पिंटू सदगीर, युवानेते रोशन आढाव, युवा उद्योजक संदीप आव्हाड, दत्तात्रय गायखे, बाळासाहेब सरोदे, पळसे ग्रामविकास मंडळाचे सेक्रेटरी राजाराम गायधनी, शिवाजीराव गायखे, मधुसूदन गायकवाड, नासाका माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.के.नाठे, सेवानिवृत्त प्राचार्य भागिनाथ घोटेकर, कांतीलाल गायधनी, ज्येष्ठ पत्रकार नंदू नरवडे, प्रा.योगेश गायधनी, रावसाहेब गायधनी, मदन ढेमसे, मनोज गायधनी, विजय पाटील, प्रा.रामदास पोरजे, ज्ञानेश्वर गायधनी, युवा उद्योजक अनिल भास्कर ढेरिंगे, श्रमभूषण रामचंद्र शिंदे, संजय फडोळ, धर्माजी सानप, संतोष ढमाले, विशाल धोंगडे आदींसह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. मान्यवरांनी पतसंस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांसह उपस्थितांचे स्वागत चेअरमन शामराव गायधनी, व्हा.चेअरमन शरद ढमाले, जनसंपर्क संचालक मनोज गायधनी, संचालक भारत ढेरिंगे, इंद्रभान जाधव, निलेश मोरे, अमोल जाधव, राहुल धात्रक, किरण ढेरिंगे, विजय वाणी, नितीन ढेरिंगे, संचालिका कोमल तुंगार, ज्योती जाधव आणि कर्मचारीवृंदाने केले.फोटोओळी:- पळसे येथील धनसमृद्धी नागरी सहकारी पतसंस्थेच्या उद् घाटन सोहळ्यात बोलताना खा.राजाभाऊ वाजे. समवेत व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक जगन्नाथ आगळे, नानेगावचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे, कामगार नेते अशोकराव जाधव यांच्यासह पतसंस्थेचे संचालक मंडळ.
