
सिन्नर (प्रतिनिधी ) आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी वर्ष १२ वे उपक्रमास उदंड प्रतिसाद या उपक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पमालेने मान वंदना देऊन करण्यात आली.सिन्नर इस्लाहि सोशल मिडिया फौंडेशनच्या वतीने राज्यभरातून आर्थिक कूर्बानी शिक्षणासाठी वर्ष १२ वे अंतर्गत उपक्रमासाठी राज्यभरातून सर्व जाती धर्मिय नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संयोजक पैगंबर शेख यांनी दिली. सिन्नर शहरातील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महामित्र दत्ता वायचळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.*याप्रसंगी महामित्र दत्ता वायचळे यांनी स्वत: च्या पेन्शन मधुन उर्दू हायस्कूल साठी १०,०००{दहा हजार}आर्थिक कुर्बानी शिक्षणासाठी दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.* कार्यक्रमात जेष्ठ शिक्षक भैय्यासाहेब सैय्यद यांनी उपक्रमाचे स्वागत केले. यावेळी सलीम शेख मलीक, सैय्यद शाकीर सैय्यद, इरफान शेख, जमीर सैय्यद,ताहीर शेख, बिलाल शेख शब्बीर काजी, सर्व बांधवांना गुलाब पुष्प देवून महामित्र परिवाराच्या वतीने महामित्र दत्ता वायचळे, रामु इदे, विजय मुठे,जमीर सैय्यद यांनी सणाच्या सदिच्छा दिल्या.
