
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२९ वा दिवस* हेतूपूर्ण जगणे, शिस्त, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सत्याचे अधिष्ठान, समत्वभाव, बंधुभाव, निर्भयता, आत्मसंयम, सद्.विचार, सदाचार, लोकहिताच्या कामाबाबत उत्साह ही लक्षणे आपल्या देशात पूर्वीच्या काळात लोकांच्या अंगी भरपूर मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. त्यामुळे आपला भारत देश हा प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर होता. मात्र आज ही लक्षणे आपल्यातून वेगाने नाहीशी होत आहेत. त्याचवेळेस लोकांमध्ये अकार्यक्षमता, कामचुकारपणा, भ्रष्टाचार, बेशिस्तपणा, अनैतिकता, धर्मासंबंधी विकृत कल्पना यातून धर्माचे व देशाचे दिवसेंदिवस अधःपतन होत चालले आहे. हे सारे वेळीच रोखले पाहिजे. *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर १७ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल १२
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ७ जून २०२५
★ निर्जला एकादशी 🚩🚩🚩🚩🚩🚩
★ बकरी ईद
★ २००२ भारताचे माजी उपराष्ट्रपती बासप्पा दानाप्पा ऊर्फ बी. डी. जत्ती यांचा स्मृतीदिन.
★ जागतिक अन्न सुरक्षा दिन.
