
नाशिक (वार्ताहर) – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून हिरवांकुर फाउंडेशनतर्फे आज ३३ जलमंदिरांचा म्हणजेच शोषखड्यांचा (रेन वॉटर हार्वेस्टिंग पिट्स) लोकार्पण सोहळा मनपा उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांच्या हस्ते करण्यात आले. समवेत विभागीय अधिकारी राजाराम जाधव, उद्यान निरीक्षक सचिन देवरे, हिरवांकुर फाउंडेशनचे अध्यक्ष निलयबाबु शाह जैन, विनजीत टेक्नॉलॉजी प्रा.ली.चे पदाधिकारी मकरंद सावरकर, मा. नगरसेविका डॉ. दिपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, परेश मारू, नलिनी शाह, राखी शाह, आर्किटेक्ट मयंक शाह, महेश चावला, अजित मेहरोलिया, डाॅ. संदीप भानोसे, रेणू भानोसे, प्रा. अमोल अहिरे, मधुर अग्रवाल, संजय फड़के, विठ्ठल चौधरी, प्रिती चौधरी, डॉ. उज्वला कापसे, अपर्णा दिवगी, ज्योती देवरे, प्रशांत देवरे, रवीभाई वेलाणी, तेजस बेदमुथा, दिपक कुलकर्णी, सुनिल भट्ट, आश्वीनी भट्ट, कमलेश संत, सरिता संत, योगेश वारे, प्रत्यय देवरे, प्रत्युषा देवरे, आदी हिरवांकुर परीवारातील सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक, पर्यावरणीय संस्थामचे पदाधिकारी, पर्यावरण प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.

जलमंदिर निर्माणाचा उपक्रम गतवर्षी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विनजीत टेक्नॉलॉजीच्या ‘विनअर्थ’ उपक्रमांतर्गत कॅच द रेन ही संकल्पना हाती घेऊन विविध प्रकारचे प्रयोग करत पाच मॉडेल साकारण्यात आले होते. यावर टीमने व्यवस्थित अभ्यास करून गेल्या दोन महिन्यात भरपूर परिश्रम घेत नाशिकमध्ये विविध ठिकाणी ३३ जलमंदिरांचे (शोषखड्डे) निर्माण केले. व कार्य पुढे सुरू आहे. या ३३ जलमंदिराची एकूण वार्षिक शोषण क्षमता जवळपास एक कोटी पन्नास लाख लिटरची असल्याची माहिती विनजीत कंपनीचे पदाधिकारी मकरंद सावरकर यांनी दिली. हिरवांकुर फाऊंडेशनला नाशिक मनपाचे भक्कम पाठबळ लाभत असून केबीटी महाविद्यालयच्या अभियांत्रिकी विभागाचे तांत्रिक मार्गदर्शन मिळते आहे. अशाप्रकारे सर्वांच्या सहकार्याने संयुक्तरित्या सदर उपक्रम साकारण्यात येत असल्याचे हिरवांकुरचे पदाधिकारी प्रा. अमोल अहिरे यांनी प्रतिपादन केले. ‘गरज ही शोधाची जननी आहे’. या उक्तीप्रमाणे जेव्हा पडेल, जेथे पडेल तेथेच पावसाच्या पाण्याचा संग्रह करण्यासाठी ‘कॅच द रेन’ संकल्पनेतून जल मंदिरांचे निर्माण कार्य हिरवांकुर फाउंडेशनने हाती घेतले असून, आतापर्यंत व्ही. एन. नाईक महाविद्यालय, बी.जी. ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात, ना. जि. मविप्रचे सि.एम.सी.एस. महाविद्यालय, भोसला मिलिटरी स्कूल व परिसर, गंगापूररोड येथील मनपा शाळा, सिरीनमेडोज येथील परिसर, अशोका मार्ग, इंदिरानगर, कामगार नगर, बळी मंदिर, कमल नगर, हिरावाडी, रामसृष्टी उद्यान तपोवन, पंचवटी, मखमलाबाद, म्हसरूळ, सातपूर, इंदिरानगर, नाशिक रोड अशा अनेकविध ठिकाणी शाळा, महाविद्यालये, खुले मैदान, मंदिर, वाचनालये, सभागृहे आदी ठिकाणी जल मंदिरांची स्थापना केल्याची माहिती हिरवांकुरचे अध्यक्ष निलयबाबू शाह जैन केले. *’जल है तो कल है,* *वरना विनाश अटल है I’*ह्या घोषवाक्याने हिरवांकुर परिवाराचे सदर कार्य सातत्याने प्रगतीपथावर आहे. सूत्रसंचलन डॉ संदीप भानोसे यांनी केले, तर आभार अजित मेहरोलीया व मंजुषा पत्की यांनी मानलेत.

“एक पेड मा के नाम” जसे प्रधानमंत्री यांनी आव्हान केले तसेच “एक जलमंदिर हर-एक परिवार के नाम”असा मूलमंत्र घेतल्यास आपण अनेक संकट व नुकसानापासून वाचू. जीवन सुजलाम-सुफलाम होऊन निश्चित धरतीवर स्वर्ग ऊतरेल – *निलयबाबू शाह जैन**
-जल मंदिर संकल्पना *एक घर एक जलमंदिर*पाणी म्हणजे ईश्वराने आपल्या दारात अगदी निशुल्क पोहोच केलेले अमृत. त्याच अमृताचा आपल्यासाठी संग्रह करायचे ठिकाण म्हणजे जलमंदिर. जल मंदिर शेत, मोकळ्या जागेवर, इमारतीचा बंगल्याचा मोकळा परिसरात उताराने जेथे पावसाचे पाणी साचते तेथे ६ फूट लांब × ६ फूट रुंद × ६ फुटापेक्षा शक्य तेवढा खोल खड्डा करावा. यामध्ये खाली ४०% मध्यम आकाराचे दगड त्यावर मजबूत अशी शेडनेटचे आवरण. त्यानंतर ४०% २०mm. खडी. त्यावर २०० gsm. चे जिओ (Non Weaving) फॅब्रिक चे आवरण. त्यावर वाळू किंवा क्रशरची वाळू सारखीच सॅंड याला चारही बाजूंनी १२ उंची कोणतीही फरशीची चौकट करावी. फरशी ८ इंच जमिनीत व ४ इंच जमिनीच्या वर ठेवावी. म्हणजे वाहून आलेली माती घाण कचरा बाहेरच राहील. ‘जल ही जीवन है’ त्यामुळे याला टिम हिरवांकुर तर्फे *जलमंदिर* असे नाव देण्यात आले आहे.
