
नांदगाव (प्रतिनिधी )शहीद जाट भगतसिंग शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदगाव येथे दिनांक 6 जून 2025 रोजी शुक्रवारी शिवराज्याभिषेक दिन उत्साह सादर करण्यात आला. मंगल प्रभातजी लोंढा, मंत्री कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनातून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधून कार्यक्रमाची आयोजन करण्याबाबतचे परिपत्रक सर्वच औद्योगिक प्रश्न संस्थांना प्राप्त झाले होते. परिपत्रकातील पंचसूत्रांपैकी सामाजिक समरसता हा विषय आजच्या दिवशी व्याख्यानासाठी निवडला होता. सर्व जाती,धर्म, वर्ग आणि पंथ यांच्यात समता, बंधुता आणि सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे म्हणजे सामाजिक समरसता यात भेदभाव न करता सर्वांना समान संधी देणे, एकमेकांचा सन्मान करणे, समाजात एकात्मता वाढविणे अपेक्षित आहे. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माननीय श्री नितेशजी शर्मा (शिवभक्त) तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रसिद्ध कवी व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे (बालभारती)चे सदस्य डॉक्टर अ. भ. भूषविले. या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य माननीय श्री राहुल शेठ परदेशी, माननीय मंगेश सरोदे, सामाजिक कार्यकर्ते श्री मनोजभाऊ चोपडे,सौ. कावेरीताई शर्मा, शरद जाधव, गणेश अहिरे, संस्थेची गटनेदेशक एम.डी. निकुंभ सर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा संस्थेचे प्राचार्य वाय. के. कुलकर्णी यांनी घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री नितीन ठुबे सर व पी.एस. गायकवाड सर यांनी केले. तर सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.ए. आर. मढवई यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सौ. उदावंत,सौ.ए.एस. सुरे, श्रीमती पि. के. साखरे, श्री. जी. आर. शिंदे श्री. एस.एस. तायडे, श्री.एच. सी. भुसारे,सौ.टी. एम. जाधव, श्री. आर.आर. गायकवाड, श्री. आर.ए. पवार, श्री. एन. बी. जगताप, श्री.ए.व्हि. पवार, श्री. वसीम शेख, श्रीमती एन.ऐ. अहिरे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व कौशल विकास रोजगार उद्योजक्ता व नाविन्यता विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सौ. मनीषा वर्मा मॅडम यांच्या व्हिडिओ संदेशाने करण्यात आली. शिवव्याख्याते नितीनजी शर्मा यांनी शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंतचे संपूर्ण विचार पुष्प गुंफले. महाराजांची दुर्गनिती, गनिमी कावा, दुर्ग बांधणी तसेच मावळ्यांची जमवाजमव यांचे सखोल विश्लेषण केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवी व साहित्यिक माननीय श्री.अ. फ. भालेराव यांनी सामाजिक समरसता हा विषय आपल्या समधुर काव्यपंक्तीच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडला. स्वराज्याचा राज्यकारभार चालू असताना महाराजांनी सामाजिक समता, बंधुता कशाप्रकारे जपली याची विश्लेषण देखील केले. सामाजिक संमतेचे अनेक उदाहरणे व दाखले दिले. भारतीय संविधानाने सामाजिक समता या विषयाला महत्त्व देऊन अधोरेखित केले आहे. हे देखील प्रकर्षाने सांगितले. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीविषयी, एका समाज घटका विषयी वाटणारी एकात्मता किंवा समता होय. हे डॉक्टर भालेराव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
