
मंचर (प्रतिनिधी) आंबेगाव विधानसभा संघटनात्मक बैठक.. आज दि.5 रोजी,भारतीय जनता पार्टी चे जिल्हाध्यक्ष माननीय श्री प्रदीप दादा कंद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संघटनात्मक दौऱ्या दरम्यान आंबेगाव येथील मंचर येथे आजी-माजी पदाधिकारी,बूथ अध्यक्ष,शक्ति केंद्रप्रमुख यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.जिल्हाध्यक्ष मा श्री प्रदीप दादा कंद यांचे आंबेगाव तालुक्यामध्ये सहर्ष स्वागत भारतीय जनता पार्टीचे नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात,आंबेगाव तालुका मध्य मंडलाचे तालुकाध्यक्ष स्नेहलताई चासकर व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले

.प्रदीप दादा कंद म्हणाले की, संजय भाऊ थोरात यांचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने आंबेगाव तालुक्यामध्ये चालू आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजना जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मोफत जनतेपर्यंत पोहोचवतात तसेच आंबेगाव तालुका मध्य मंडळाचे तालुकाध्यक्ष स्नेहलताई चासकर यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती हे कार्यक्रमा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उत्साहात साजरे करण्यात आले.उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले तसेच आंबेगाव तालुक्यातील नवनिर्वाचित मंडल अध्यक्षांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…यावेळी भाजपा जिल्हा पदाधिकारी,मंडल अध्यक्ष,कार्यकर्ते उपस्थित होते.
