
सिन्नर (प्रतिनिधी )6 जून 1316 जव्हार संस्थान स्थापना दिवस व संस्थापक श्रीमंत जयबाराजे मुकणे महाराज यांचा राज्याभिषेक दिन व 6 जून 1342 श्रीमंत धुळबा (नेमशाह) मुकणे महाराजांचा राज्याभिषेक दिन यानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने सिन्नर येथे राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते.
जव्हार संस्थान चे संस्थापक जयबाराजे मुकणे यांनी ०६ जून १३१६ मध्ये स्थापन केले.आदिवासींच्या इतिहासाची साक्ष देणारा जव्हार संस्थानाचा राजवाडा. वारल्यांच्या ताब्यात असलेलं जव्हारचे राज्य आपल्या ताब्यात घेण्यासाठी आदिवासी कोळी महादेव वीर जयाबा मुकणे यांनी चौदाव्या शतकात जव्हार च्या किल्ल्यावर चाल करून वारली सुभेदार सुंभाटे यांचा पराभव करून जव्हार राज्य आपल्या ताब्यात घेतले.व वारली सुभेदार सुंभाटे यांना गंभीरगडची सुभेदारी देऊन त्यांना जव्हार राज्यात सामावून घेतले आणि आपलं संस्थान निर्माण केलं.ते या जव्हार संस्थानाचे पहिले राजे झाले.जव्हार राज्यात सह्याद्रीपट्टयातील एकुण २२किल्ले होते.१३३९ मध्ये दख्खन भागात मोगलांचा शिरकाव झाला.दिल्लीचे खिलजी घराणे, तुघलक घराणे हैदराबाद येथील बिदरशाही घराण्यातील अहमद शाह वली यांनी जव्हार राज्याला त्रास देत होते परंतु जवाहरच्या प्रत्येक राजवटीने मुत्सद्दीपणा व शौर्य दाखवत आपले राज्य अबाधित ठेवले.दिल्लीच्या महंमद बिन तुघलक याने या जव्हार च्या राज्याचे अधिपत्य मान्य करत जायबाराजेंचे जेष्ठ पुत्र धुळबा यांना ” नेमशाह” असे नामकरण करून ०६ जून १३४२ ला राज्याभिषेक करवून अधिकृतपणे गादीवर बसविले.याच संस्थानाच्या राजाने दिल्लीच्या सत्तेविरुद्ध १६७१ साली बंड केले व शिवाजी महाराजांना सामिल झाले. शिवाजी महाराज सुरत लुटण्यासाठी जव्हार मार्गाने गेले होते त्यावेळी जव्हार च्या राजाने त्यांना सैन्याची मदत केली होती.पुढे या जव्हार च्या राज्याच्या संस्थानाचे अनेक उत्तराधिकारी झाले आणि ते भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत टिकले.या संस्थान चे शेवटचे उत्तराधिकारी राजे यशवंतराव मार्तंडराव मुकणे होते.भारत स्वतंत्र झाल्यानंतर १० जून १९४८ रोजी जव्हार च्या राज्याचे संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय मुठे प्रास्ताविक रामु इदे तर आभार नामदेव वाजे यांनी मानले.
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, नामदेव वाजे, राजेंद्र बेंडकुळे, बबन जोशी, पांडुरंग ढोली, रविंद्र कांबळे, संदिप मुठे, जगन्नाथ डगळे, किरण मुठे, बाळनाथ कार्ले, दिनेश लोंढे,शुभम मुठे, अभिषा वायचळे आदि.उपस्थित होते.
