
मुंबई :(प्रतिनिधी ) राज्यातील भटके व विमुक्त जातींच्या कल्याणासाठी आज मुंबई येथील विधान भवनात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस भटके विमुक्त कल्याण समितीचे अध्यक्ष आणि आमदार सुहास कांदे यांनी अध्यक्षता केली.विशेष म्हणजे, समितीच्या स्वातंत्र्य कार्यालयात प्रवेश करत असताना आमदार कांदे यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ. अंजूमताई कांदे, तसेच नाशिक युवा जिल्हा प्रमुख फरानदादा खान हे उपस्थित होते.या बैठकीत भटके-विमुक्त समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सध्या या समाजासाठी निधीची कमतरता असून, निधी वाढवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घेण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.राज्यात सुमारे ११ टक्के लोकसंख्या भटके व विमुक्त समाजाची आहे, यासाठी विशेष धोरण आखण्याची गरज असल्याचे सर्वसाधारण मत यावेळी व्यक्त झाले. या बैठकीस संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.
