
, मनमाड (प्रतिनिधी ) कातरवाडी: रामदास सिताराम आहेर
वय 45 गट नंबर 83 लागत भडाणे रायपूर शिव रस्ता रात्री साडेनऊच्या दरम्यान मजुरी करून घरी परत येत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

सचिन भाऊसाहेब आहेर हे रस्त्याने गाडीवरती जात असताना त्यांना अचानक रक्त दिसले व झाडांमध्ये आवाज आला त्यांनी गाडीचा प्रकाश चमकावला असता त्यांना बिबट्या दिसला त्यांनी आवाज देऊन परिसरातील नागरिकांना बोलावले तर त्या ठिकाणी रामदास आहेर हे निदर्शनात आले व रघुनाथ सुखदेव वाघ यांनी ही माहिती पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांना दिली व त्यांनी तत्काळ वन विभागाला बोलवून पुढील प्रक्रिया सुरू केली रात्री पंचनामेसाठी शासकीय रुग्णालय चांदवड येथे नेण्यात आले वन विभागाने पुढील पंचनामा तपास चालू केला आहे

अशी सविस्तर माहिती भागवत झाल्टे वन्यप्राणी पशु मित्र यांनी दिली
काल रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात रायपूर भडाने येथील शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता आज सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या शेत शिवारात येऊन पाहणी केली असता या ठिकाणी बिबट्याचा वावर आहे असे सांगितले व या ठिकाणी दोन पिंजरे लावण्यात आले आहे वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी तहसीलदार मंदार कुलकर्णी साहेब यांच्याशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनीही शासनाकडून जी मदत होईल ती आम्ही प्रयत्न करू असे तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी सांगितले आहे

त्यावेळेस वन्य पशु प्राणी मित्र भागवत झाल्टे यांनी असे सांगितले की परिसरातील नागरिकांनी सतर्क करावे शाळेतील मुलांना जातानी काळजी घ्यावी शेतात जाताना रात्रीच्या वेळेस बॅटरीचा वापर करावा परिसरात वन विभागाने दस्त घालावे अशी झाल्टे यांनी माहिती दिली: यावेळी श्री. उमेश वावरे, म. उप-वनंसरक्षक, नाशिक श्री. सहाने साहेब, स.व.सं. मनमाड स्थित चांदवड श्री. संजय वाघमारे, व.प.अ चांदवड (प्रादे.) श्री. वैभव गायकवाड, अजय शिंदे-वनपाल श्री. खंदारे, श्रीम. साळवे, श्रीम. मरशिवणे, श्री. चव्हाण, श्री. परदेशी, श्री. व्हरगळ, श्री. टेक श्री. मार्गेपाड-वनरक्षक श्री. शिंदे, श्री. देवरे, श्री. वाघ, श्री. पवार वनसेवक
