
नांदगाव ( प्रतिनिधी,मुक्ताराम बागुल) नाशिक, अहिल्या नगर या दोन जिल्ह्यांमध्ये गुटख्याची मोठ्या प्रमाणात कोट्याधीश विंचूरच्या गुटखा माफीयांच्या नाशिकच्या नांदगाव पोलिसांनी मुसक्या आवडल्या. हा गुटखा माफिया अतिशय शातीर आहे. दर चार दिवसांनी कोटींचा गुटखा आणून तरुण वृद्ध लोकांना व्यसनाधीन करत आहे. अनेकांचे आयुष्य उध्वस्त करत आहे. हा गुटखा माफिया बेळगाव ते विंचुर पर्यंत गुटखा कसा आणतो हे शोधणे गरजेचे आहे. पान टपरी ते होलसेल किराणा दुकान ते किरकोळ छोट्या-मोठ्या टपरीमध्ये खुलेआम गुटखा पोहोच सेवा देणारा हा गुटखा माफिया संबंधित विभागांना आजपर्यंत का दिसला नाही. गुटख्याची वाहतुक करण्यासाठी कधी आयशर गाडी असते. तर कधी पिकप गाडी असते. काही दिवसापूर्वी विसरला पत्रकारांनी आवाज उठवला तर या गुटखा माफी आणि महिलांना पुढे करून अनेक प्रकारच्या कुलुपत्या केल्या होत्या. या गुटख्याच्या धंद्यामध्ये महिला राजरसपणे उभ्या असतात. वेळप्रसंगी या महिला जो आवाज उठविल त्याला मारहाण पण करतात. नांदगाव पोलीस स्टेशन हद्दीत

एका महिंद्रा बोलेरो पिकप गाडी क्रमांक एम. एच. 19 बी.एम.023 ही बेळगाव येथून नांदगाव कडे येत असताना अडवण्यात आली. सदर वाहनांमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला. अवैध गुटखा साठवून वाहतूक करत असल्याचे आढळून आले. या प्रकरणात एकूण 16,39,000/ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्यात (१) निलेश दिलीपचंद बोथरा रा. विंचूर ता. निफाड जि. नाशिक (२) महेश रमेश आहेर राहणार विंचूर तालुका निफाड जिल्हा नाशिक यांच्याविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आले असून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
