
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी -नवनाथ गायकर यांजकडुन)- जळगाव जिल्हयातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथुन ३१५ वर्षाची परंपरा असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताई आईसाहेबाची पालखी आज शुक्रवार दि.६ जुन रोजी दु.१२ वा.श्रीक्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर येथुन श्री पांडुरंगाचे भेटीसाठी आषाढी वारीच्या अनुषंगाने सालाबाद प्रमाणे प्रस्थान करणार असल्याची माहिती आदिशक्ती संत मुक्ताई आईसाहेब पालखी दिंडी सोहळयाचे प्रमुख ह.भ.प. रविद्रं महाराज हरणे यांनी दिली आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने श्री. पांडुरंग भेटीस पंढरपुरला महाराष्ट्रातुन प्रमुख सात संताच्या पालखी पायी दिंडी सोहळा निघत असतो.

यात संत निवृतीनाथ महाराजाचीं श्रीक्षेत्र त्रंबकेश्वरहुन, संत ज्ञानेश्वर माऊलीचीं श्रीक्षेत्र आळंदी, संत सोपान काकाचीं श्रीक्षेत्र सासवडंं,आदिशक्ती संत मुक्ताई आईसाहेब यांची श्रीक्षेत्र कोथळी, मुक्ताईनगर, संत तुकोबाराय यांची देहु, संत एकनाथ महाराज यांची पैठण तर संत नामदेव महाराज नरसी येथुन पालखी पायी दिंडी सोहळा निघणार आहे. श्रीक्षेत्र मुक्ताईनगर ते श्रीक्षेत्र पंढरपुरचा पायी प्रवास सर्व दिंडी सोहळयांपेक्षा जास्त कालावधीचा, एकुण तीस दिवसाचा आहे.विशेष म्हंणजे ही पायी पालखी महाराष्ट्रातील पाच जिल्हयामधुन ठरलेल्या निश्चित मार्गाने जाते. या दिंडीत महाराष्ट्र भरातुन असंख्य वारकरी संप्रदायाचे भाविक सहभागी होत असतात. महाराष्ट्र शासनाने निर्मल वारीतंर्गत स्वच्छता व भाविकाच्यां सोईसाठी तब्बल दोन कोटी रुपयाची संत मुक्ताई संस्थानला मदत दिली असुन त्यातंर्गत फिरती स्वच्छतागृहे, पाण्यासाठीचे टँकर आदीसह मदत केल्याची माहिती ह.भ.प. रविद्रं महाराज हरणे यांनी दिली आहे. प्रस्थानापुर्वीच्या संध्येला त्यांचे संत मुक्ताई मंदिरात जाहिर किर्तन ही झाले.
